
0
4
8
2
9
0
सागरसृष्टी
सुंदर सागरी किनारा
फेसाळल्या लाटांची
लयलूट करणारा..
सांजवेळीचा झुळझुळ वारा
हृदयी भरणारा….
अस्तास जात्या दिनकराला
उदासीन निरोप देणारा…
पुन्हा त्याचा आगमनाची
आतूरतेने वाट बघणार..
उगवत्या सूर्याला मग लाटांचे अर्घ्य देणारा..
सूर्य किरणांना तो
आनंदाने कवेत घेणारा…
युगानुयुगे असाच तु
विराजमान लाटांवरी..
जलमय तरी दिसतो
लांब क्षितीजापरी…
किती गूढ,किती रम्य बहुमोल
खजिना लपविला तू अंतरी..
किती विशाल ही सागरसृष्टी..
तुझ्या मुळेच शक्य निसर्गात जलवृष्टी…
मृदुला कांबळे
गोरेगाव -रायगड
======
0
4
8
2
9
0



