Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजननागपूरपरीक्षण लेखमहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध

पु.ल.’ महाराष्ट्राचे बहुआयामी व्यक्तिमत्व

कुसुमलता दिलीप वाकडे दिघोरी उमरेड रोड,नागपूर

0 4 8 2 9 3

पु.ल.’ महाराष्ट्राचे बहुआयामी व्यक्तिमत्व

महाराष्ट्राचे लाडके बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेले अर्थात पुरूषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांची 8 नोव्हेंबर ला 106 वी जंयती. मराठी वाडःमयीन संस्कृतीच्या प्रवाहात आजही वाचकाच्या मनात घर करुन राहिलेले एक नाव. पु.ल. यांचा जन्म 8 नोव्हेंबर 1919 रोजी मुंबईतील गावदेवी भागात झाला. पु.ल. म्हणजे एक उत्तम कथाकार, नाटककार, अभिनेते, दिग्दर्शक आणि संगीतकार, बुध्दिमता, माणसाच्या अंतर्मनाचा शोध घेणारे, विनोदी लेखन हास्याचा खळखळता झरा.

“व्यक्ती आणि वल्ली” मधील परोपकारी गंपू, अंतू बर्वा , नारायण, हरी तात्या ,सखाराम गटणे ,नामू परीट अशा व्यक्तीरेखा वाचताना कितेकदा आपल्याच आसपास वावरणाऱ्या माणसाचा भास होतो. पुलच्या विनोदात उपरोध अधिक जाणवत असला तरी, तो कुणाला टोचणारा किंवा बोचणारा नव्हता.”बटाटयाची चाळ” मधील गमती जंमती नागरी जीवनाचे दर्शन घडविते. तर “असा मी असामी” यात मध्यमवर्गीय संघर्षातले हसू दिसतात. माझ्या ग्रंथसंग्रहालयात ही सर्व पुस्तके आहेत. ‘पुलं’नी गुळाचा गणपती, दुधभात,देवपावला, मोठी माणसे, मानाचे पान, नवराबायको, देवबाप्पा, चोखामेळा अशा चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक केले.’देवबाप्पा’ मधील नाच रे मोरा हे गाणे आजही रसिकांच्या ओठांवर रुंजी घालत आहे.

पु.ल.देशपांडे यांना अनेक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेत. जसे पद्मश्री सन्मान, साहित्य अकादमी, महाराष्ट्र भूषण, पद्मभूषण, महाराष्ट्र राज्य वाडःमय पुरस्कार, साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, बरेचदा त्या काळात मोठ मोठया सेलिब्रिटीज पुलंना कार्यक्रमात बोलवले जायचे तेव्हा ते प्रसंगानुरूप पुढील व्यक्तीवर विनोद करीत, पण कुणाच्याही भावना न दुखःविता हास्यातून कल्लोळ उठून प्रेक्षकवर्ग वातावरण आनंदमय व्हायचं.

पुलची ‘अपूर्वाई’, ‘पूर्वरंग’ आणि ‘जावे त्याच्या देशा’ आम्हाला एम.ए. च्या मराठी वाड्मयला होती. काळ बदलला, तंत्रज्ञानाने संवादाचे रुप पालटले. पण पुलनी सांगितलेल्या माणुसकीचा विनोद अजूनही तितकाच ताजेतवाना आहे. ते म्हणतात, “आयुष्यात मला भावलेलं एक गुंज सांगावेसे वाटते. उपजिविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयांच शिक्षण जरूर घ्या पण साहित्य, चित्र,संगीत, नाट्य,शिल्प,खेळ हयातल्या एखादया तरी कलेशी मैत्री जमवा. कारण पोटापाण्याचा उघोग तुम्हाला जगवेल, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल”.असे हे विचारशील व्यक्तीमत्त्व 12 जून 2000 ला जे काळाच्या कुठल्याही वादळात न हरवता विनोदस्वर लुप्त झालेत. पण ‘पुलं’ आजही मराठी लोकांच्या घराघरात जगतात.

कुसुमलता दिलीप वाकडे
दिघोरी उमरेड रोड,नागपूर
========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे