Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजननागपूरपरीक्षण लेखविदर्भसाहित्यगंध

एक सत्यकथा

सविता धमगाये ता. जि.नागपूर

0 4 8 2 9 7

एक सत्यकथा

एक म्हण आहे ‘दाने दाने पर लिखा है खाने वाले का नाम’. कोण कुठला तो अनाहूत पाहुणा. किती आर्जव डोळ्यात सांभाळून घ्या ना मला. माझ्या जिवलगांनी तर सोडली माझी साथ.. रस्त्यावर भटकतोय एकाकी. शोध शोध शोधतोय पण नाही सापडत. रस्ता पण नाही आठवत. जाऊ तरी कसा घरी. ती बघा दिसतेय एक समोर गाडी. आता चिरडून निघाली तरी चालेल. नाहीतरी भटकून भटकून मरायला टेकलोय. आली आली गाडी आली. अंधार दिसतोय डोळ्यासमोर. हा कोण उतरला गाडीतून. मारेल का मला…. मला सापडल्या तो रस्त्यावर. डोळ्यात प्राण आणून आप्तांची वाट पाहणारा. हात लावून बघितले तर, अगदी निपचित, शांत. कुणीतरी सोडून दिलं असेल किंवा वाट चुकला असेल. घाबरलेला खूप. अंगावर जखमा जातभाईंनी दिलेल्या. उचलून गाडीत टाकलं आणि आला घरी. रात्री दहा अकराचा सुमार आणि या नवीन पाहुण्यांचे आगमन झाले घरी. रात्रीचे उरलेले जेवण दिले अधाशासारखे खाऊन घेतले आणि पाणी पिऊन अंगणातील एका कोपऱ्यात राहिला पडून.

सकाळी पाहिले तेव्हा गळ्यावर चिघळलेली मोठी जखम, खोलवर गेलेली. एक पाय सुद्धा जखमी. चिघळलेला. सुरवातीला छान डेटॉल घातलेल्या गरम पाण्याने स्वच्छ आंघोळ घातली. जखमावर घरीच तात्पुरता उपचार केला. पण घरी उपचार शक्यच नव्हता. फिरत्या दवाखान्यात काॅल लावून बघितला. लगेच गाडी घरी आली. त्यांनी मोफत औषधोपचार केले. त्यालाही थोडं बरं वाटलं. एव्हाना अंगावर चमक येऊ लागलेली. नैराश्य जाऊन परत जगण्याची आशा निर्माण झाली. दुसऱ्या दिवशी खाजगी दवाखान्यात पाठवलेच. त्यांनी व्यवस्थित पायाची जखम, गळ्यावरची जखम स्वच्छ केली. अगदी आवाज न करता कुठलीही भूल न देता जखमा स्वच्छ केल्या. अगदी शांत बसलेला उपचार होईस्तोवर. साधी ठेच लागली तर थयथय नाचणारे आपण आणि खोलवर गेलेल्या जखमा शांतपणे स्वच्छ करून घेणारा तो. कसं जमलं असेल त्याला. परिस्थितीने शिकवलं असेल का.?

आता घरी आहे आरामात. नाव पण सांगता येत नाही त्याला. काय म्हणून बोलवत असतील बर त्याला. बरं नाही सांभाळून होत तर कशाला पाळतात. आणि मग रस्त्यावर सोडून देतात. एवढही कळत नाही कसा जगेल. कसा सामना करेल परिस्थितीचा. आपल्याच जातभाईंपासून कसा वाचवेल स्वतःला. जाऊ द्या आता त्याला नवीन नाव देणार. कुणाला दत्तक म्हणून हवा असेल तर नक्की संपर्क करा. उच्च प्रतीचा लॅब्राडार आहे बरं का…!!!

सविता धमगाये
ता. जि.नागपूर

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे