
0
5
6
8
0
0
निवांत क्षण
धकाधकीच्या जीवनात
शोधतेय निवांत क्षण
गोंगाट गजबजाट सर्वत्र
पसरलंय आवाजाचं रण
सकाळपासून रात्रीपर्यंत
सतत असते कामाची घाई
वाटे तनास मिळावा विसावा
मिळेना मात्र शांतता काही
कामाच्या रगाड्यात होते
मन,भावनांची कुचंबना
रात्री झोपताना आठवायचे
पुढील दिवसाचे नियोजना
स्वतःसाठी जगायचे तर
बेजार करते जबाबदारी
शोधून शोधून मिळत नाही
तन मनाला निवांत उभारी
जाऊन मंदिरी करावी
ध्यानधारणा योगासने
जबाबदा-या खेचतात मागे
होईना तेही कार्य नेमाने
सुलोचना लडवे
जिल्हा अमरावती
0
5
6
8
0
0



