0
4
8
2
9
3
प्रेमवाणी
किती झुरते
किती सरते
आयुष्य इथे
मिळे प्रेमवाणी
जयाला तोच
विजयी ठरते
नफरतीचे जग
काळीज चिरते
क्षणक्षण भासे
काळरात्र जणू
जगणेच होते
जिवंतच मरणे
भाग्यवान ते…
ज्यांना लाभते
प्रेमवाणी निर्मळ
जपून ठेवा ती
ह्रदयीच्या कुपीत
त्याहून न धन दुजे
हेच असे खरे गुपीत
सौ.वैशाली अंड्रस्कर,चंद्रपूर
=========
0
4
8
2
9
3



