0
4
8
2
9
3
प्रेमाच्या पलीकडे
प्रेमाच्या पलीकडे
नात्यास असावे नाव
नाते मनामनातील
घ्यावा वेळीच रे ठाव
प्रेम ही भावना असे
मनाची तरल अवस्था
जुडतो जेव्हा प्रेमभाव
वाढते परस्पर आस्था
छळू नये कोणासही
एकतर्फी प्रेमातून
प्रेमाच्या पलीकडे
पहावे अंतर्मनातून
प्रेमाच्या पलीकडे
असते लक्ष्मणरेषा
ओलांडताना पहावी
होणार नाही दुर्दशा
प्रेमाच्या पलीकडे
प्रेमच शाश्वत असते
निस्वार्थ भावना ठेवा
त्यातच स्वर्ग दिसते…
दत्ता काजळे,ज्ञानाग्रज
उमरगा जि.धाराशिव
=========
0
4
8
2
9
3



