आरोग्य व शिक्षणई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजननांदेडमराठवाडासंपादकीय
दीड दमडीची कोंबडी
तानाजी निवृत्तीराव भोसले
0
1
9
8
8
5
दीड दमडीची कोंबडी
फुकटचे राशन फुकटचीच एसटी
निघाली गावा नाही जवळ दमडी
मुंगीच्या पाठीवर हत्तीची सवारी
जत्रेला गेली दीड दमडीची कोंबडी
फुगिर पणाचा तिने कळस गाठला
गंध पावडर करुन ती गाडीत बसली
मांजराच्या लग्नात कुत्र्याची वरात
घोड्याच्या पाठीवर जावून फसली
कुत्र्याची शेपटी मांजराने ओढली
गाढवाने दिली तवा कुत्र्याला साक्ष
नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न
घारीने ठेवली पाळत कोंबडीवर लक्ष
लग्नाला जमली सारी वऱ्हाडी मंडळी
गाढवाने पांघरली वाघाची त्या चमडी
मंडपात बसले तवा सारे एकसाथ
आनंदात वाहून गेली बहाद्दूर लोमडी
लग्नात भेट आणला सोन्याचा पलंग
पलंगाचे पाय जसे बगळ्याची तंगडी
जेवणासाठी ठरवला एक सर्वांनी बेत
फुकटची मारली ‘दीड दमडीची कोंबडी’
तानाजी निवृत्तीराव भोसले
ता.देगलूर जि.नांदेड
========
0
1
9
8
8
5