Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजननागपूरमराठवाडामहाराष्ट्र

उच्च श्रेणी मुख्याध्यापिका मायादेवी गायकवाड यांना केंद्रप्रमुख म्हणून पदोन्नती

परभणीच्या शिरपेचात मानाचा तुरा

0 4 8 2 8 0

उच्च श्रेणी मुख्याध्यापिका मायादेवी गायकवाड यांना केंद्रप्रमुख म्हणून पदोन्नती

परभणीच्या शिरपेचात मानाचा तुरा

कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या राज्य कार्यकारणीतील ज्येष्ठ सदस्या

राज्यातील साहित्य क्षेत्रातील प्रसिद्ध ज्येष्ठ कवयित्री

जिल्हा प्रतिनिधी, परभणी

परभणी: कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या राज्य कार्यकारणीतील ज्येष्ठ मार्गदर्शक व उच्च श्रेणी मुख्याध्यापिका म्हणून zpps उक्कलगाव येथे कार्यरत असलेल्या ‘मायादेवी अंकुश गायकवाड’ यांना
आज दिनांक 08/01/2025 रोजी केंद्रप्रमुखपदी पदोन्नती देण्यात आली आहे.

मायादेवी गायकवाड यांनी सेलू तालुक्यातील केंद्र मोरेगाव या ठिकाणी पदोन्नती घेतली आहे. शिक्षण क्षेत्रात त्यांचा 36 वर्ष सेवेचा अनुभव आहे.

1989 मानवत येथून त्यांनी आपल्या सेवेला सुरुवात केली. शिक्षका, म्हणून अल्पकालच कार्य केले. प्रभारी मुख्याध्यापक, इंग्रजी विषयाच्या प्राथमिक पदवीधर, डी पी ई पी पाथरी, तालुका महिला संचालिका ,सर्वं शिक्षा अभियान साधन व्यक्ती, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय मानवत उप मुख्यद्यापिका, तसेच एन पी ई जी एल मुलींचे शिक्षण साधन व्यक्ती, साक्षरता अभियान, राज्यस्तरीय तज्ञ् प्रशिक्षक अश्या ठिकाणी कार्य केल्याने, तो अनुभव, केंद्रप्रमुख पदाचे प्रमोशन देवून केला. आपल्या कार्यास सेवा मानून जीवनाची वाटचाल सुरु ठेवली.

फावल्या वेळेत सामाजिक समस्या सोडवण्याचे कार्य करत आहेत. उत्तम कुशल वक्ता,महिला समस्यावर लेखन करणाऱ्या कवयित्री आणि लेखिका आहेत.नागपूर येथील बहुउद्धेशिय, सेवभावी संस्था मराठीचे शिलेदार समूहाचे संस्थापक अध्यक्ष आणि संपादक,आदरणीय राहुल पाटील यांच्या मार्गदर्शनामुळे त्यांचे, ‘ज्ञानज्योत’ आणि ‘ज्ञान स्पर्श’ हें दोन काव्य संग्रह प्रकाशित झालेत.

तालुका मानवत येथील शिक्षक पतसंस्थाच्या अध्यक्षा तसेंच, परभणी येथील भारतरत्न डॉआंबेडकर पतसंस्था संचालिका असून, कास्ट्राइब शिक्षक संघटेनाच्या राज्य सदस्य आहेत. त्या विविध पुरस्काराने सन्मानित असून मानवत पोलीस स्टेशनच्या पोलीस मित्र आणि शांतता समिती मानवत अध्यक्ष आहेत.दर रविवारी स्वतः च्या घरी, महिला, कीशोरी, युवती, समुपदेशन केंद्र आवड म्हणून चालवतात. तुटतं असलेले, संसार जोडणे, भरकटलेल्या तरुणीला योग्य मार्ग दाखवणे गरजूना आर्थिक सहकार्य करून उद्योग करण्याची प्रेरणा देतात.

तसेच सामाजिकं भान ठेवून उतरदायित्व निभावाने त्यांना आवडते. शिव फुले शाहू आंबेडकर, जिजाऊ सावित्री अहिल्या बाई होळकर याआपल्या प्रेरणादायी महापुरुषांचे वीचार,पेरणे हें कार्य निष्ठा पूर्वक करतात. त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे