
0
6
2
9
0
4
रक्तबंधन
गुलू गुलू हसणारं
टुकू टुकू बघणार
पाळण्यातलं गोजीरं
बघता हरपलं भान
माय जाता मजूरीले
बहीण माय झाली
गोंजारून सान बाळा
ओठी फुटतसे ओवी
बोल बोबडे तिचेही
इवलाले तिचे हात
तरी कवटाळले हृदयासी
सांभाळते सावधाने
गाठ बांधली नशीबाने
पदरात भाऊ आला
अनोखे रक्तबंधन
माय झाली तायडीची
गोंजारते निजवते
ती स्वतःच लहान
करपले बालपण
पाठी घेऊन बंधूराजा
गाठे शाळेचा दरवाजा
गाठे शाळेचा दरवाजा
सविता धमगाये
ता. जि.नागपूर
0
6
2
9
0
4



