Breaking
कवितानागपूरमहाराष्ट्रसाहित्यगंध

बुधवारीय ‘काव्यरत्न’ स्पर्धेतील रचना

0 4 8 2 9 7

*✏संकलन, बुधवारीय ‘काव्यरत्न’ स्पर्धा*
➖➖➖➖➿????➿➖➖➖➖
*‼मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘बुधवारीय काव्यरत्न’ कविता स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट काव्यरचना*‼
➖➖➖➖➿????➿➖➖➖➖
*????मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿????➿➖➖➖➖
*????????????सर्वोत्कृष्ट दहा????????????*

*????विषय : शब्दव्यूह????*
*????बुधवार : ०५ / जून /२०२४*????
➖➖➖➖????????????➖➖➖➖
*शब्दव्यूह*

रूपं तुझं साधं
करतं जीवा वेडं
पाहू दे मन भरून
थांब ना गं थोडं..
रेशमी कुंतल
त्यावर धुंद गजरा
खुलून येतो असा
मुखचंद्रमा साजिरा..
घायाळ करी मज
तुझ्या नजरेचा बाण
झलक तुझी पहाया
व्याकूळ माझा प्राण..
किती असे फसवे
शब्दव्यूह तू रचले
दिली अंतरंगी जागा
मीही त्याला फसले..
त्याग, समर्पण
हे गोंडस शब्द वापरले
लज्जा, संस्कार हे
अलंकार क्षणी विसरले..
भुलले शब्दजालास
कुशीत गेले अलवार
स्पर्श तो वासनेचा
जाणवला सभोवार..
अंतर्मनाने घातली साद
म्हणे सावधपणे वाग
होईल तुझा अभिमन्यू
ना परतीस मिळेल जाग..
वाजता धोक्याची घंटा
मनमस्तिष्क झाले जागे
व्यूह आला ध्यानी
पाऊल वळले मागे..!

*स्वाती मराडे, इंदापूर पुणे*
*©सहप्रशासक, मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????✍️????♾️♾️♾️♾️
*शब्दव्यूह*

अक्षरे भिजती अश्रूंत
गर्भारून प्रसवती कविता
बोलून जातो प्रत्येकजण
का आधार हरवता

सहन करिती तन
ऊन्हाचीही रण-रण
परी सहन करावे कैसे
शब्दांचे सततचे व्रण

चूक असता मनही
पार करी चक्रव्यूह
अकारण पाठीशी लागून
सोसावे कसे शब्दव्यूह

पहिलेच खंगता परिस्थितीने
का वार करता शब्दाने
छिन्नभिन्न झाले तरी
बोटे मोडती नावाने

*सौ.भावना अजय इटकीकर*
*हिंगणघाट जि.वर्धा*
*©सदस्या,मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????✍️????♾️♾️♾️♾️
*शब्दव्यूह*

देह अंतर्बाह्य झिजला
भेदण्यास हे चक्रव्यूह
गुंतलो प्रवासात शब्दांच्या
मज आव्हान शब्दव्यूह

शब्दांनीच मांडला खेळ
आज अर्थवाही जीवनाचा
अडकलो शब्दजंजाळात
मी शोध घेतो प्राक्तनाचा

शब्द झालेत सोबती सदा
माझ्या साहित्य प्रवासाचे
जडले अनामिक नाते माझे
ऋण अमौलिक तयांचे

मज गवसले शब्द धन
बनले माझा काव्यप्रकाश
बहरल्या काव्यपंक्ती सदा
झाले ठेंगणे आकाश

हे शब्दव्यूह देईल विश्वास
माझ्या अबोल भावनेला
वरदान शब्द प्रभुत्वाचे लाभो
माझ्या अजोड लेखणीला

गुंफतो शब्दांना आता
पेरतो नवनिर्मितीचे बीज
अर्थ प्रवाही दान देता
होईल साहित्यिक चीज

हे शब्दव्यूह भेदून अखंड
साकारले माझे काव्यांगण
झाले सार्थक साहित्य प्रांती
देता आदरे शब्दांना अलिंगन

*श्री.पांडुरंग एकनाथ घोलप*
*ता.कर्जत जि.रायगड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????✍️????♾️♾️♾️♾️
*????कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ३.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰????➰➿➿➿➿
*शब्दव्यूह*

शब्द अडकती
शब्द अडकवती
जन भडकवती
जणू शब्दव्यूह

शब्द खरे
शब्द खोटे
जुळवती फसवती
जणू शब्दव्यूह

शब्द अर्थ
शब्द परमार्थ
मिळवती मोक्ष
जणू शब्दव्यूह

शब्द सहारा
शब्द किनारा
साधती डाव
जणू शब्दव्यूह

शब्द अंत
शब्द प्रारंभ
मनाचा खेळ
जणू शब्दव्यूह

शब्द मुके
शब्द बोलके
मनात खल
जणू शब्दव्यूह

शब्द मोकळे
शब्द बंधन
गुढ आक्रंदन
जणू शब्दव्यूह

*शर्मिला देशमुख -घुमरे, बीड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????✍️????♾️♾️♾️♾️
*शब्दव्यूह*

अक्षर अक्षर जुळवले
शब्दफुले फुलविली
चारोळी छान जमली
वसुधात्यातच रमली….

शब्दं ओंजळीत भरले
ह्रदयात शब्द साठवले
कवितेतही साकारले
यातूनच काव्य खुलले…..

शब्दांची रत्ने चमकली
शब्दधनात विखुरली
चारोळींच्या बागेत
आरामात विसावली…..

गोड,गोड शब्दांनी
कविताही सुखावली
कधीतरी कटू शब्दांनी
शब्दबाग जरा दुखावली…

शब्दांचीच नाती गोती
लयबद्धतेत छान राहती
पण कधीतरी अचानक
शब्दपण जरा रूसती…

शब्दव्यूहातून सावरले शब्द
विरामचिन्हात विसावले
नाचले अलंकारिक तालावर
वाचन पाठात तज्ञांनी गोवले….

*वसुधा वैभव नाईक*
*धनकवडी, जिल्हा -पुणे*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????✍️????♾️♾️♾️♾️
*शब्दव्यूह*

सखे तुझ्या शब्दव्यूहाने
घातली मनाला भुरळ
टाकते असे शब्दजाळ
की मन होतंय हळहळ.

मोहक शब्दजाळयात मी
अडकत गेलो क्षणोक्षणी
प्रीत जडली जीवापाड
वरले तुलाच मनोमनी.

थोड्याच दिवसांत तुझं
मला अवहेरून बोलणं
जाणवतं होतं तुझ्यात
माझचं खोलवर गुंतणं.

क्षणिक समाधानाचा
हेरला कावेबाजपणा
शब्दव्यूहात फसवून
तू देत होतीस यातना.

नाहीच होणार अभिमन्यू
घातली अंतर्मनाने साद
डाव ओळखून मी तुझा
सोडला आपसुकच नाद.

*सौ.सुजाता सोनवणे.*
*सिलवासा दादरा नगर हवेली.*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह.*
♾️♾️♾️♾️????✍️????♾️♾️♾️♾️
*शब्दव्यूह*

डोसक घुमवते शब्दव्यूह
मस्तक राहेना थारेवर
होते अविचाराने तह
जिवी धरते धारेवर…

शब्दांच्या कचाट्यात
सापळे रचून गोवले
ठाऊक नोयते घडन असे
हयुहयु दलदलीत पाय रोवले…

वलय पाशात गुंडाळलो
सुटता सुटेना गुंता तिढा
कडू विषाचा प्रयोग केला
गोडगुलाबिने मुखी भरविला पेढा…

शब्दाची केली पडताळणी
लावली होती करणे छाणनी
अभद्र शब्दाचा गट वेगळा केला
वाळीतल्या गोंधळले संभ्रमानी…

*प.सु.किन्हेकर, वर्धा*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????✍️????♾️♾️♾️♾️
*शब्दव्यूह*

शब्द होतात कधी तलवार
अन् करतात सरळ वार
कधी सामर्थ्याने पेलतात
सांत्वनाचा अवघड भार

हजरजबाबीपणाचा असे
हे शब्दच उत्तम उदाहरण
मोठमोठ्या विद्वानांनाही
क्षणात यावं लागतं शरण

शब्दव्युह रचता चातुर्याने
पुरता अडकतो प्रतिस्पर्धी
मुद्दाच सुचेनासा होतो मग
क्लिष्ट वादविवादात कधी

शब्दबद्ध भावना अशा की
वाचून वाचक होतो स्तब्ध
कवितेत व्यक्त होतो असा
विचारांचा अव्यक्त प्रारब्ध

फक्त एका शब्दाने मनास
मिळतो मोठा दिलासा
कोंडलेल्या श्वासांचा अन्
हृदयाचा खुलतो आरसा

तनमन मोहून टाकणारी
अशी ही शब्दांची किमया
कलेकलेने बहरवते जी
संवेदनांची सप्तरंगी दुनया

*मीता नानवटकर नागपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????✍️????♾️♾️♾️♾️
*शब्दव्यूह*

शब्दामध्ये असते ताकद
सारे काही बदलण्याची
शब्दखेळी करतात जेव्हा
होत्याचे नव्हते करण्याची ॥
शब्द नसावेत बाणासारखे
काळीज रक्तबंबाळ करणारे
शब्द नसावेत अग्नीसारखे
दुःखाने होरपळून टाकणारे ॥
शब्द असावेत मल्हमा सारखे
हृदयास फुंकर घालणारे
शब्द असावेत सुगंधासारखे
मनी सुखावह दरवळणारे ॥
शब्दांचाच खेळ सारा
जोडावे की तोडावे
वृत्ती असेल ज्याची जशी
तसे शब्दव्यूह रचावे ॥
शब्दव्यूहाचा जसा डाव
तसा इतिहास घडून गेला
शब्दव्युहातून अभिमन्यूस्तव
चक्रव्यूह रचला गेला ॥
शब्द असतील सामोपचाराचे
तरच घडतील सुसंवाद
शब्द असतील लावालावीचे
घडून येतील वादविवाद ॥
शब्दव्यूह रचला जावा
ज्यातून विश्वास प्रसूत व्हावा
माणूस माणसाशी जोडण्यासाठी
भक्कम विसावा देऊन जावा ॥

*सौ सरला टाले*
*राळेगाव, जि.यवतमाळ*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????✍️????♾️♾️♾️♾️
*शब्दव्यूह*

शब्दात जणू साचती
भावना मनीचे शब्दात ती
ओठात येती व्यक्त होण्या
ह्रदयातूनी बोल शब्दात ती

गुंफून ती माळ शब्दांची
सुखदुःखाची सारथी
जीवनाचे सार मनाच्या
शब्दांच्या संग पालथी

आनंद असो वा निराशा
भावनेतून व्यक्त होती
शब्द हे अबोल मुखी
हसत सारे झेलती

शब्दव्यूह प्रेमाचे रस भरी
उजळून टाकते बोलाने
मन कधी कसे कुणाचे
प्रफुल्लित करी आनंदाने

*सौ पुष्पा डोनीवार*
*चंद्रपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️????✍️????♾️♾️♾️♾️

➖➖➖➖????????????➖➖➖➖

*????सर्व विजेत्यांचे अभिनंदन* ????
*सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*????

➖➖➖➖????????????➖➖➖➖
*????????संकलन / समूह प्रशासक????????*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖????????????➖➖➖➖
*????मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖????????????➖➖➖➖

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे