
0
3
4
5
6
1
भिजकी वही
जगण्याचे मर्म ! लिहीले अभंगे
केले पांडुरंगे ! अर्पणची !!
व्हावया सुखद ! जनांचे जीवन !
करुनी कवन ! मार्ग दावी !!
परि ना आवडे ! गाथा तुकोबांची
होते नाठाळची ! जन ऐसे !!
करुनी चुगल्या ! कानही भरती!
तेणे संतापती ! रामेश्वर !!
घेऊनिया गाथा ! सोडावी नदीत !
जाओनी त्वरीत ! इंद्रायणी !!
सोडती आदेश ! शास्त्री रामेश्वर !
जोडोनिया कर ! ऐके तुका !!
गुंडाळोनी गाथा ! घेऊनिया गेले !
नदीत सोडिले ! अभंगांसी !!
व्याकूळ होऊन ! सोडिलेसे अन्न !
झालासे प्रसन्न ! पांडुरंग !!
भिजकी वही ती ! आली तरंगून !
भक्तासी रक्षिले ! विठाईने !!
पाहोनिया ऐसा ! डोळा चमत्कार!
जोडी दोन्ही कर ! रामेश्वर !!
अर्चना सरोदे
सिलवास, दादरा नगर हवेली
आणि दमण व दीव
0
3
4
5
6
1