0
4
8
2
9
0
ये रे श्रावणा
बरसू दे सरीवर सरी
तू तरी मनावर घे ना..
काळेकुट्ट मेघ दाटूनी
कोसळ ये रे श्रावणा…
बळीराजा तो जोमानं
पेरणी करून बियानं..
चातकासम वाट पाहे
तृष्णा शमेल येण्यानं…
आषाढही आला गेला
त्यानेही दिले ना ध्यान..
सोसवेना झाले पिका
टाकून देऊ लागे मान…
धरा नटली सजलीया
ती हिरवा शालू नेसून..
चिंबचिंब अंग भिजव
सौंदर्यवती येई दिसून…
ये श्रावणा दान देण्या
पदरी भरून बळीराजा..
कृपादृष्टी कर तू गड्या
तव् नामेचं गाजावाजा…
बी एस गायकवाड
पालम,परभणी
========
0
4
8
2
9
0



