0
4
0
9
0
3
शिदोरी
सत्ता,संपत्ती,वैभव
सर्व ठरते कुचकामी
शिदोरी ज्ञानाची असता
झळकते व्यक्तिमत्व नामी
सत्य,अहिंसा,शांती,न्याय
नांदो समाजात निरंतर
ज्याच्या अंगी वसती विचार
तो सर्वांपेक्षा बलवत्तर
देणे लागतो काही समाजाचे
रूजले विचार अंतःकरणी
सत्किर्तीचा तो मालक
कृती तयाची उमटे मनी
ख-या ज्ञानाची शिदोरी
देते आयुष्यभर सोबत
बाकी वैभव असे क्षणिक
अज्ञानाने होई ते उध्वस्त
थोर महात्म्यांनी दिलेला
ज्ञानरूपी भांडवल वसा
चालवावा नित्य जीवनी
उमटवावा ज्ञानाचा ठसा
श्रीमती सुलोचना लडवे
अमरावती
सदस्या,मराठीचे शिलेदार समूह
0
4
0
9
0
3





