0
4
8
2
9
3
वेदनेचे रंग
नियतीच्या कुंचल्याने, वेदनेचे रंग भरलेत
मात्र संवेदनशील रसिक, इथे कुठे उरलेत?. //
दुःखाश्रूंचे कढ जरी, डोळा भरून आलेत
सांत्वनाचे चार शब्दही, खूप महाग झालेत..//
विश्वासाने मान टाकू, असे खांदे दुरावलेत
सुखातले सोबती, ना जाणो कुठे हरवलेत..//
कुणास जीव लावू , केसाने गळे कापलेत
परक्यांचे तर सोडा, आपलेच हापापलेत. //
करू तरी कुणाकडून, अपेक्षाही भंगलेत
आशा वाटत होती, ते आत्मसुखी रंगलेत..//
उपेक्षेच्या वाळवंटात, इथे अनेक सुकलेत
मी ही एक त्यातलाच, जे असेच मुकलेत..//
व्यथा वेदनेच्या रंगाने, मन पापुद्रे उललेत
खंत ना खेद आता, जीव दशाही कललेत..//
विष्णू संकपाळ बजाजनगर
छ. संभाजीनगर
0
4
8
2
9
3



