
0
4
8
2
9
0
तो चेहरा
तो चेहरा तुझा हसरा
डोळ्यातील ते भाव
आजही मज ओठावर
प्रितफुला तुझेच नाव
गजबजलेले ते शहर
आणिक तुझा सहवास
लाघवी तुज बोलणं
भरवायचा कधी घास
गप्पा रंगता तुझ्या माझ्या
वाटायचा हर्ष मज उरी
भेटीअंती मन धुंद होई
प्रित झळके हृदयांतरी
हृदय कप्यात जतन सारे
तुझ्या सहवासातले ते क्षण
तो चेहरा ती प्रितभरी नजर
भूतकाळ पुसेना वेडे हे मन
आता नाही ना परतून ते
पुन्हा पुन्हा सुखद क्षण
बंध नात्याचे घट्ट ठेवेल
आता फक्त अपूली आठवण
प्रतिमा नंदेश्वर चंद्रपूर
0
4
8
2
9
0



