विद्यार्थी कवी संमेलन उत्साहात साजरे
वसुधा वैभव नाईक, प्रतिनिधी पुणे
विद्यार्थी कवी संमेलन उत्साहात साजरे
वसुधा वैभव नाईक, प्रतिनिधी पुणे
पुणे ( दि २९): काव्ययोग काव्य संस्था,पुणे आयोजित विद्यार्थी कवी संमेलन उपक्रम क्र. १२ आयोजित करण्यात आला होता.हा उपक्रम म.न.पा.शाळा.पिसोळी येथे पार पडला.यावेळी कार्यक्रम अध्यक्ष शिक्षक मनोज कुमार खाटमोटे ,विशेष उपस्थिती बाल साहित्यिका सौ.वसुधा नाईक तसेच एकपात्री कलाकार प्रा. शरदचंद्र काकडे आदी मान्यवर उपस्थितीत होते.
यावेळी शाळेतील १५ विद्यार्थ्यांनी स्वरचित कविता सादर केली तसेच यातून प्रथम, द्वितीय,तृतीय क्रमांक काढण्यात आले.सर्व सहभागी विद्यार्थ्यांना सन्मानपत्र,मेडल देण्यात आले.तसेच विजेत्या विद्यार्थ्यांना मेडल,सन्मानपत्र,अक्षरधन देऊन गौरविण्यात आले. विजेत्यांना राज्यस्तरीय कविसंमेलनात सहभाग घेता येईल, असे काव्ययोग काव्य संस्था अध्यक्ष मा. योगेश हरणे यांनी जाहीर केले.
मा.योगेश हरणे यांचा वाढदिवस असल्याने शाळेला त्यांनी मायक्रोस्कोप भेट म्हणून दिली. त्यावेळी त्यांनी सांगितले की शाळेसाठी लागणारे साहित्य ‘फुल ना फुलाची पाकळी ‘देण्याचे कार्य प्रत्येकाने करावे. एकपात्री कलाकार प्रा शरदचंद्र काकडे यांनी आपल्या कलेतून विद्यार्थ्यांना खळखळून हसवले.तसेच सौ वसुधा नाईक यांनी आपल्या बालकवितेतून विद्यार्थ्याची मने जिंकली.या वेळी मिसेस काकडे देखील उपस्थित होत्या.
या कार्यक्रमाचे आयोजन शाळेतील शिक्षक आयुब शेख व शाळेतील सर्व शिक्षक तसेच योगेश हरणे,उपाध्यक्ष गौरव पुंडे तसेच सचिव तुषार पालखे यांनी केले.





