जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज,आवासचे सुयश
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज,आवासचे सुयश
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
अलिबाग ( दि २९ रायगड): सोमवार दि. २९ सप्टेंबर २०२५ रोजी हाशिवरे हितवर्धक मंडळाचे महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, हाशिवरे, ता.अलिबाग, जि.रायगड तर्फे शारदोत्सवा निमित्ताने जिल्हास्तरीय वक्तृत्व व गीतगायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये वक्तृत्व स्पर्धेत इ.९ वी व इ. १० वी या तृतीय गटात आवास सासवने धोकवडे रहिवासी हितवर्धक मंडळाच्या बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आवास मधील *पायल संजय म्हात्रे* [ इ.१० वी अ ] या विद्यार्थीनीने द्वितीय क्रमांक मिळविला. स्पर्धेसाठी अॉपरेशन सिंदूर हा विषय देण्यात आला होता.
या यशस्वी विद्यार्थीनीचे ग्रुप – ग्रामपंचायत, आवासच्या सरपंच अभिलाषा अभिजीत राणे, आवास सासवने धोकवडे रहिवासी हितवर्धक मंडळाचे अध्यक्ष रणजीत प्रभाकर राणे, संस्थेचे सर्व पदाधिकारी, सर्व सभासद, शालेय समितीचे सर्व पदाधिकारी व सर्व सभासद, तसेच मुख्याध्यापक / प्राचार्य अनिल दारकुंडे सर, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.





