Breaking
अमरावतीअहमदनगरई-पेपरकविताकोकणखानदेशगोंदियाचंद्रपूरछत्रपती संभाजी नगरधाराशिवनागपूरनांदेडनाशिकपरभणीपश्चिम महाराष्ट्रपुणेबीडभंडारामराठवाडामहाराष्ट्रवर्धाविदर्भसोलापूर

सोमवारीय काव्यवेणी स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना

0 4 0 9 0 3

➖➖➖➖➿⚜️➿➖➖➖➖
*☢️संकलन, सोमवारीय ‘त्रिवेणी’ काव्यस्पर्धा☢️*
➖➖➖➖➿⚜️➿➖➖➖➖
*❇मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘सोमवारीय त्रिवेणी काव्य स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना’*❇
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट दहा🎗🎗🎗*

*📘स्पर्धेचा विषय :मदतीचा हात📘*
*🔸सोमवार : २९/ ०९ /२०२५*🔸
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*मदतीचा हात*

जगाचा पोशिंदा आज आहे संकटात
अपेक्षा आहे मिळावा मदतीचा हात
स्वप्न सारीच उद्ध्वस्त झाली पाण्यात

*बी एस गायकवाड*
*पालम,परभणी*
*©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔸🔹🔸♾️♾️♾️♾️
*मदतीचा हात*

नसतो तो फक्त मदतीचा हात
त्यात वसे माणूसपणाची बात
सोडूनी भेद, धर्म, वंश, जात

*स्वाती लभाने, वर्धा*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔸🔹🔸♾️♾️♾️♾️
*मदतीचा हात*

कठिण प्रसंगी कुणालाही
जरूर द्यावा मदतीचा हात
उपकार नसावा मनात…

*विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर*
*©सदस्य सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔸🔹🔸♾️♾️♾️♾️
*मदतीचा हात*

*परतीच्या पावसाने निःशब्द झालाय*
*तनमनधनाने पुरता तो कोलमडलाय*
*द्या मदतीचा हात उभारण्यासाठी*

*श्री बळवंत शेषेराव डावकरे*
*मुखेड जिल्हा नांदेड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔸🔹🔸♾️♾️♾️♾️
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ४.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*मदतीचा हात*

फाटले आभाळ,कृषकाच्या बहरलेल्या शेतीत
नि उभे पिक मिसळले मातीत
शोधतो मदतीचा हात माणुसकीच्या जातीत

*सौ वनिता गभणे आसगाव भंडारा*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔸🔹🔸♾️♾️♾️♾️
*मदतीचा हात*

मित्रा तू दिलेला मदतीचा हात
कायम राहील माझ्या स्मरणात
धावून येईन मी तुझ्या संकटात

*सौ.प्रतिमा नंदेश्वर चंद्रपूर*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔸🔹🔸♾️♾️♾️♾️
*मदतीचा हात*

कधी कोरडा तर कधी ओला
दुष्काळ शेतकऱ्याच्या जणू पुजला पाचवीला
घडते आत्महत्या मदतीचा हात कसला??

*राजश्री मिसाळ ढाकणे बीड*
*शिक्षिका, कवयित्री, हायकूकारा*
*©सदस्या – मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔸🔹🔸♾️♾️♾️♾️
*मदतीचा हात*

जगाचा पोशिंदा म्हणतो ज्याला
नैसर्गिक आपत्तीने हतबल झाला
आत्महत्येपूर्वी मिळावा मदतीचा हात

*सौ सरला टाले राळेगाव यवतमाळ*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔸🔹🔸♾️♾️♾️♾️
*मदतीचा हात*

मदतीचा हात द्या आधी
साऱ्या शेताची झाली नदी
सरकारला जाग येईल कधी

*साजेश मगरे*
*तालुका पूर्णा जि. परभणी*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔸🔹🔸♾️♾️♾️♾️
*मदतीचा हात*

स्वार्थाविना मदतीचा हात जेथे
साधनेला काय उणे तेथे….
पण हल्ली षढरिपूंची रेलचेल

*तारका रुखमोडे*
*अर्जुनी जि. गोंदिया*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔸🔹🔸♾️♾️♾️♾️

➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*💐सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.🙏*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन /मुख्य प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार ‘त्रिवेणी’ काव्यसमूह*
➖➖➖➖🪻💚🪻➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🪻💚🪻➖➖➖➖

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 0 9 0 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे