0
4
8
3
0
2
प्रेमाचे आडिट
तुझ्या माझ्या प्रेमाचे आडिट
करू लागले समस्त जन
कुजबुज कुजबुज सुरू झाली
वा-यागत फिरू लागलय मन
करून टाक एकदाचे
निर्णय अंतिम घेऊन
हिशेब होईल सरळ नी
जगू सुखाने भरभरून
काय दिले,काय घेतले
ह्या गोष्टी ठरतात गौन
पक्की कर लगीनगाठ
पाळतील लोक मौन
रोज छुप्यासारखं भेटणं
आता नाही रे जमणार
कर एकदाचे प्रेमाचे आडिट
समाज नकार नाही देणार
असती नियम आडिटला
ती आपण पाळायला हवे
प्रेमाचं आडिट करून टाक
उभारू आपले घरकुल नवे
श्रीमती सुलोचना लडवे
जि अमरावती
सदस्या,मराठीचे शिलेदार समूह
0
4
8
3
0
2



