कविताचंद्रपूरनागपूरविदर्भसाहित्यगंध
लाडोबा; प्रतिमा नंदेश्वर

0
4
8
3
0
1
लाडोबा
होत एक तान्ह बाळ
चेहरा त्याचा चंद्रावाणी
गोबरे गोबरे त्याचे गाल
दिसे जसं आरसपाणी l
आई म्हणायची लाडोबा
खूप खूप लाड करायची
शेजारणी आल्या घरी तर
दृष्ट बाळाची काढायची l
तान्हा लाडोबा मोठा झाला
दुडूदुडू घरात चालू लागला
बाबांनी आणली खूप खेळणी
आनंदाने तो खेळू लागला l
खेळता खेळता पाय घसरला
लाडोबा आमचा खाली पडला
सावरायला धावले आईबाबा
ओरडून ओरडून खूप रडला l
अंगणवाडीत मग जाऊ लागला
पोस्टीक आहार घेऊ लागला
बाईंनी शिकवल्या गाणी गोष्टी
घरी आईला सांगू लागला..
प्रतिमा नंदेश्वर चंद्रपूर
===========
0
4
8
3
0
1



