Breaking
ई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजननागपूरपरीक्षण लेखविदर्भसाहित्यगंध

‘आभारीय मनोगत’; सुलोचना लडवे, अमरावती

दर्जेदार रचना निर्मितीला प्रोत्साहन

0 4 8 2 9 3

‘आभारीय मनोगत’; सुलोचना लडवे

दर्जेदार रचना निर्मितीला प्रोत्साहन

आज दि.२२-०१-२०२५ ला ‘धपाकुटी’ या माझ्या बालकाव्याला सर्वोत्कृष्ट पोस्टरने सन्मानित करण्यात आले. मागील आठवड्यात माझ्या ‘हायकू’ रचनेला सर्वोत्कृष्ट पोस्टरने सन्मानित केल्या गेले. आनंद लहरींनी मन भारावून गेले. समूहाचे सर्वेसर्वा, कल्पवृक्ष, देवांश आदरनीय राहुल दादा पाटील सर यांची सदोदित ऋणी आहे. यासोबतच माननीय सविताताई, वैशालीताई, विष्णुदादा, तारकाताई, स्वातीताई, अशोकदादा,अरविंद दादा, हंसराज दादा आणि समस्त परिक्षक टिमची मी मनःपूर्वक आभारी आहे.

आदरणीय दादा आणि संपूर्ण टिमचे श्रम अवर्णनीय आहेत.आपणामुळे आम्हाला व्यासपीठ मिळाले ही फार मोठी आनंदाची गोष्ट आहे. ‘तुमचा फोटो पाठवा’ हा दादांचा मॅसेज निश्चितच त्या दिवसाला सोनेरी बनवतो. उत्सुकता वाढते आणि पोस्टर पाहल्यानंतर होणारी आनंदाची जाणिव म्हणजे जणू स्वर्गीय सुख. पोस्टर कुणाचेही असो सकाळपासून ते पाहण्याची उत्सुकता शिगेला पोहचते.

अनेक दर्जेदार कवि, कवयित्रींच्या रचना वाचायला मिळतात. त्यातूनही लिखाणात मला सुधारणा करण्याची संधी मिळते. ‘धपाकुटी’ हा खेळ बालपणी खेळायचो. त्याचे पुसटसे नियम लक्षात होते. त्या आधारावर रचना लिहीली आणि ती सर्वोत्कृष्ट पोस्टरने सन्मानित झाली.या प्रोत्साहनाने निश्चितच लिखाणात सुधारणा करण्याचे बळ मिळाले.

प्रकृती अस्वास्थ्यामुळे औषध तर घ्यावीच लागतात. पण रोज लेखनात मन लावणे हे ही औषधाचे काम करत आहे. त्यामुळे प्रकृती स्वास्थ्य ठीक राहते हा माझा अनुभव आहे. अभिनंदनाचा वर्षाव करून शुभेच्छा देणारे आदरनिय ताई, दादा (सुजाताताई, विष्णुदादा, मृदुला ताई,प्रतिभाताई, स्वातीताई , राजश्रीताई, डावकरे दादा, प्रतिमाताई) आणि सर्व ताई दादांचे मनःपूर्वक आभार. पुनश्च सर्वांचे मनःपूर्वक आभार.

श्रीमती सुलोचना लडवे
जि.अमरावती
©सदस्या,मराठीचे शिलेदार समूह

1/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे