
आधार
सावली तुझी मी तू माझा आधार
लाभला मला तुझे झाले उपकार
नश्वर आहे जग हे सारे संपणार
तू आहे माझ्यासाठी स्वर्गाचे दार
स्वप्न ही तुझे सारे स्वाहा झाले
जीवन तू तुझे सारे समिधा केले
जसे हवन दधीचीचे वज्र मिळाले
अंकुरले वैभव मज काते कळाले
नोकरी दिली तू शहरी स्थिरावलो
गाव सुटला माझा नि मी दुरावलो
आठवणींचा स्पर्श घडवतो थरार
पगारीसाठी झालो किती लाचार
अंगा खांद्यावरचा तो खेळ आठवतो
तुझ्यासंगे जगलेला काळ आठवतो
आठवते मला तुझ्या चाहुलीची आस
कसा विसरू माझा राजेशाही थाट
घड्याळीच्या इशाऱ्यावरी माझा ताल
घाण्याच्या त्या बैलापरि हे माझे हाल
आलेले नशिबी जे ते भोगावे लागणार
तूच आहे माझी ती न भेदणारी ढाल
तुझी संस्कारी शिदोरी माझ्या हाती
मिळाला मला हा वारसा ही माती
स्वाभिमानी जीवन मी ही जगणार
विजयाची संघर्षमय वात पेटणार
विचारांचा वसा तुझा मी चालवणार
आकाशात ताऱ्या समान चमकणार
घाबरणार नाही मी न लागणार धाप
माझे छत्र आभाळा परी माझा बाप
ए. बी.पठाण
छत्रपती संभाजी नगर



