
0
5
3
6
2
7
आठवण
आठवण, जेव्हा येते
मन घायाळ होते
डोळ्यातून पाणी वाहते.
आठवण, मनाला दूर नेते
हृदयाला पिळून जाते
विरहात झुरत राहते.
आठवण, एकांतात पळत येते
प्रियजनांना मनात खेळवते
कधी रडवते तर कधी हसवते.
आठवण, आकाशात उंच जाते
तर कधी पाताळात भिडते
मनाला पाखरू बनुन दूर उडते
आठवण कधी दुखात लोळते
कधी सुखात नटून मिरवते
तर कधी घायाळ होऊन पळते
आठवण, क्षणात जग फिरवते
मनात दडलेले कोडे गिरवते
एकट्यात मनाला रडवते
आठवण प्रेमाची शिदोरी
भूतकाळ घटनेची तिजोरी
आठवणीत रडायची ही चोरी.
बेबीताई आनु विठ्ठलराव बोईनवाड
जिल्हा नांदेड.
======
0
5
3
6
2
7



