चला निसर्गमित्र होऊ या…!!
डॉ ज्ञानेश्वर माशाळकर ता उमरगा जिल्हा धाराशिव.
चला निसर्गमित्र होऊ या…!!
आजकाल परिस्थिती वाईट निर्माण झाली आहे.कारण प्रत्येक गावात बायपास रोडमुळे अगोदरची वडाची, उबंराची, लिंबाची, आंबाची मोठं मोठी झाडे तोडून टाकली आणि रोडची कामं केली आहेत. त्यामुळे आपल्या परिसरात 43° ते 44° पर्यंत तापमानाची नोंद झाली आहे. रानावनात राहणाऱ्या प्राण्यांना आणि वनस्पतीना पाणी मिळाले नाही. गावातील शेतीतील बोअरवेलमध्ये पाणी नव्हते. पाण्यासाठी टाॅंकरची वाट पाहावी लागत होती. आता तरी सर्वाना हात जोडून नम्र विनंती आहे की प्रत्येकानी एक तरी झाड लावावे. रोडच्या भविष्यात पोटात ओरिजिनल अन्न टाकायचा असेल आणि शेती करायची असेल, तर यावर्षी आपल्या घर आणि दुकानाचा बाहेर बाहेर 1/1 झाड आणि शेतात प्रती एकर कमीतकमी २० झाडे लावा. अन्यथा हवामान बदलामुळे शेती बरबाद होईल.
*एक झाड 50 वर्षांत 35 लाख रूपये किंमतीचे वायू प्रदूषण टाळते.
*एक झाड 15 लाख रुपये किंमतीचे ऑक्सिजन उत्पादन करते.
*एक झाड 40 लाख रूपये किंमतीचे पाण्याचे रीसाइक्लिंग करते.
*एक झाड 1 वर्षांत 3 किलो कार्बनडाय ऑक्साईडचा नाश करते.
*एक परिपूर्ण झाड 1000 हजार माणसांचे जेवण शिजवण्यासाठी उपयोगी येते.
*एक झाड आसपासच्या परिसरातील तापमान 2*अंशाने कमी करते.
*एक झाड 12 विद्यार्थ्यांना वह्या व पुस्तके तयार करण्यासाठी उपयोगी पडते.
*एका झाडापासून कुटुंबासाठी लाकडी सामान तयार होते.
*एका झाडावर 100 पक्षी घरटे बांधून राहू शकतात व त्याच्यावर त्यांच्या 25 पिढ्या जन्माला येतात आणि मधमाश्यांचे पोळे झाडावर असल्यास तीच संख्या लाखावर जाते.
*एक झाड 18 लाख रूपये किंमतीचे जमिनीची धूप थांबवते.
*एक झाड माणसाला लहानपणीच्या पांगुळगाड्या पासून ते आराम खुर्चीपर्यंत तसेच वार्धक्यातील हातातील काठी पासून स्मशानातील लाकडापर्यंत साथ देते.
*एक झाड आपल्या पालापाचोळयाची भर टाकून जमिनीची कस वाढवते.
*एक झाड फळ,फुल,बिया आपल्यासाठी देते.
एक झाड 50 वर्षांत काय करत़े आणि आपण माणसं काय करतो याचा लेखाजोखा आम्ही मुद्दामच मांडत आहोत जेणे करून प्रत्येक माणूस ह्याचा विचार करेल.
*आता नाही तर कधीच नाही.
,तुमची आमची मुले पाठीला ऑक्सिजनचा सिलेंडर लाऊन फिरताना कशी दिसतील विचार करा.
*जगातील सर्व पैसा जरी एकत्र केला तरी आपण 6 महिने
पुरेल येवढा ऑक्सिजन आपण तयार करू शकत नाही.
*मग मित्रांनो तुम्ही आम्हाला एक सांगा कि असं कुठलं स्त्रोत्र तुमच्य कडे आहे, ज्या माध्यमातून आपण आपल्याला लागणारा ऑक्सिजन तयार करू शकतो.
*तासभर ऑक्सिजन विकत देणा-या डाँक्टरांना आपण देवदूत मानतो पण आयुष्यभर फुकट आँक्सिजन देणाऱ्या झाडांची मात्र कत्तल करतो.
*म्हणून तर मित्रांनो संत परंपरा आपल्याला सांगून गेली.
।। वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे ।।
संकलन: डॉ ज्ञानेश्वर माशाळकर
ता उमरगा जिल्हा धाराशिव.
==============



