Breaking
अहमदनगरआरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजनछत्रपती संभाजी नगरदेश-विदेशनवी दिल्लीनागपूरपरीक्षण लेखमराठवाडामहाराष्ट्रमुंबईविदर्भसंपादकीय

“रेल्वे डायमंड क्राॅसिंग.. गतीशिलता, कलात्मकता, आणि सुरक्षिततेचा अद्भूत संगम”;विष्णू संकपाळ

शुक्रवारीय हायकू काव्यस्पर्धेचे परीक्षण

0 4 8 2 8 6

“रेल्वे डायमंड क्राॅसिंग.. गतीशिलता, कलात्मकता, आणि सुरक्षिततेचा अद्भूत संगम”;विष्णू संकपाळ

शुक्रवारीय हायकू काव्यस्पर्धेचे परीक्षण

भारतात स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांनी रेल्वे आणली. पहिली रेल्वे १६ एप्रिल १८९३ रोजी बोरीबंदर ते ठाणे दरम्यान धावली. दगडी कोळसा ते वीज, नॅरो गेज ते ब्राॅड गेज अशी रूपे बदलत भारतासारख्या विशाल लोकसंख्येच्या देशात रेल्वेचे जाळे हे एक प्रवासी आणि मालवाहतूकीचे सर्वात प्रभावी, स्वस्त व सुरक्षित माध्यम बनले. आज अमूलाग्र बदल झालेले लोहमार्ग आपण पाहतो आहोत. अनेक छोट्या शहरांना सुद्धा जोडताना वेळेचे अचूक नियोजन हेच रेल्वे व्यवस्थापनाचे अद्भूत कौशल्य बघायला मिळते.

अहोरात्र चालणारी जलद अतिजलद वाहतूक. प्रचंड मोठ्या रेल्वे गाड्या. डोळ्याचे पाते लवते न लवते तोच पाच पंचवीस डब्याची गाडी कांही क्षणात पास होते. तितकीच गर्दी या सर्व गोष्टी विनाअपघात पार पाडताना अभियंत्याच्या बुद्धीचातुर्याचा कस लागत असेल. २५०/३०० किमी प्रतीतास इतक्या प्रचंड वेगाने धावणार्‍या गाड्या नियंत्रित करणे, त्यांची सतर्क सिग्नल प्रणाली, क्राॅसिंग सिस्टिम, मार्ग बदलणे या सर्व गोष्टी अचंबित करणार्‍या आहेत. महाराष्ट्रात मुंबई, मनमाड, दौंड, कल्याण, पूणे, भूसावळ, नागपूर अशी काही मोठी जंक्शने आहेत जिथून संपूर्ण देशात ये जा करणाऱ्या गाड्या असतात.

रेल्वे वाहतूक प्रणालीत क्राॅसिंग सिस्टीम ही एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. महाराष्ट्रातील नागपूर येथे एक देशातील एकमेव डबल “डायमंड क्राॅसिंग” आहे. या ठिकाणी दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता या भारताच्या चारही दिशांनी ये जा करणार्‍या गाड्या एकमेकांना अचूक वेळेत क्राॅस करतात. या चौरसाकृतीत निर्माण केलेल्या छेदन बिंदूचे दृष्य वरून पाहिले तर ते हिर्‍यांच्या आकारासारखे दिसते. म्हणूनच याला डायमंड क्राॅसिंग म्हंटले जाते.

गाड्यांच्या वेळापत्रकाचे अचूक नियमन हा एक भारतीय रेल्वे अभियंत्यांच्या बुद्धी कौशल्याचा मूर्तीमंत नमुना आहे. इतक्या प्रचंड व्यस्त क्षेत्रात शून्य अपघात नियंत्रण प्रणाली चोवीस तास कार्यान्वित ठेवणे हीच एक अद्भुत गोष्ट आहे.
एक क्षणही किती महत्वाचा असतो ना..! हे रेल्वे क्रॉसिंगवरील रेल्वेची वाहतूक पाहून लक्षात येते . एकच मार्ग दोघांना ओलांडून वेगवेगळ्या दिशेने जायचे असते तेव्हा समोरासमोर येण्याची शक्यता अधिक असते पण छत्तीसच्या आकड्याप्रमाणे टक्कर न देता, एकमेकांच्या सामाईक मार्गात येऊनही सुखरूपपणे क्राॅस करून पोहचवण्याचे काम तंत्रज्ञ करतात तेव्हा खरेच कमाल वाटते नि डायमंड क्राॅसिंगवरील या क्राॅसिंगला डायमंड सलाम करावा वाटतो.!!!

लोहमार्गास
छेद परस्परास
रोखतो श्वास

काल शुक्रवारीय हायकू काव्य स्पर्धेकरिता आ. राहुल दादांनी हेच चित्र देऊन हायकूकारांसमोर आव्हान उभे केले. चित्र पाहता त्यातील तंत्रज्ञान, कौशल्य, अचूक वेळ, थरार, कलात्मकता, सुरक्षितता, कुशलता, बुद्धीचातुर्यता या गोष्टी हायकू निर्मितीत येणे अभिप्रेत होते. अनेकांनी स्तुत्य प्रयत्न केला आहे. तरीही हायकू लेखनात चित्राचा सूक्ष्म अभ्यास खूप महत्वाचा असतो. त्यातून क्षण टिपणे हे विशेष..! सर्वांच्या लेखणीला शुभेच्छा. मला हायकू परीक्षणाची संधी दिल्याबद्दल आ. राहुल दादांचे आभार..!

विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर
©सदस्य सहप्रशासक परिक्षक मराठीचे शिलेदार समूह

5/5 - (3 votes)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 6

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे