0
4
8
3
0
0
भरकटलेले आम्ही
धरसोडपणा सत्तेसाठी
करत असतोस, स्वार्थापाई,
करतोस संचित,पापाची
भरमसाठ काळी कमाई.
विचार आणि आचारात
कधीच तारतम्य,नसते,
कोलांटउडी मारतोस सहज
नफा,किती, पाहून वागणे असते.
दुर्गुण,इतके वाढवीलेस की
सद्गुनांचा विसरच पडला,
भरकटलेले आम्ही,पथभ्रष्ठ
हीच ओळख, आहे, सर्वांला.
अशोभनीय वागणे तुझे
व्यसनांध, कामंध दुराचारी,
वाट बदलती,लोकं तूला पाहून
कलंकीत डाग, नको समजू सोनेरी.
तूझ्या मुलांनी, काय घ्यावा आदर्श?
प्रश्न,नसेल का पडला,तुला?
वेळ अजूनही, सरली नाही,
आवर,भरकटलेल्या विचाराला.
मायादेवी गायकवाड
मानवत परभणी
0
4
8
3
0
0



