
0
3
5
6
3
1
श्वासोत्सव
रंगुनी मी सप्तरंगी रंगात..
वाहलो अनिलासंगे झोतात
हिंडलो सृष्टीच्या नवचैतन्यात
निजलो रम्य टिपूर चांदण्यात
जाहलो धुंद निसर्ग संगितात
न्हाहलो आयुष्याच्या निर्झरात
तृप्तलो प्रेमप्रीतीच्या स्पर्शात
सुखावलो मायेच्या आभाळात
ओलावलो ममतेच्या सागरात
ना अडकलो ‘अहं’ गर्वबंधनात
मजसाठी माझा जगण्याचा सोहळा
केला मी हर श्वासांचा श्वासोत्सव
ना खंत आता राही उरी जरी
ना होवो माझ्या अंताचा महोत्सव
तारका रुखमोडे
अर्जुनी मोर, जि गोंदिया
=========
0
3
5
6
3
1