Breaking
ई-पेपरकवितागोंदियाचंद्रपूरनागपूरमहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध

श्वासोत्सव

इंदू मुडे ब्रम्हपुरी

0 4 8 2 9 4

श्वासोत्सव

कर्तव्याचे परीघ लांघून
व्हावे जबाबदारीतून मुक्त
आपल्यासाठीच करावेत
काही कायदे नियम सक्त

योग प्राणायामने करावी
प्रत्येक दिवसाची सुरवात
श्वासांचा आनंदी उत्सव
व्हावा निसर्ग सानिध्यात

हृदयाच्या नाजूक कुपीत
एक धडधडणारं स्पंदन
मोकळा श्वास घेतल्यावर
आनंदित होतं तन मन

जीवन आणि मृत्यूतील
केवळ श्वास असतं अंतर
आयुष्याचं गणित थांबत
श्वास निघून गेल्या नंतर

देहात फिरत असतो
निरंतर श्वास कोवळा
हरघडी.. प्रतिदिन व्हावा
जगण्याचा श्वासोत्सव सोहळा.

इंदू मुडे ब्रम्हपुरी
जि चंद्रपूर
=======

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे