
0
6
3
9
6
0
तपन
उभी तपन तपते
बळी शिवारी राबते
कोरड्या भुईत …
ठिकऱ्या फोडते..
काया जरते जरते
कोरड घशाले पडते
डोळी अभ्र ओथंबते
अभिषेकानं घर्माच्या
भूईमातेले वलावते
झाली अंगाची काहिली
शिका झाडाले बांधते
त्यात तान्हुलं निजते
रणरणत्या तपनीत
बळी सपान पाहते
आज सोसतो तपन
उद्या मिळंल रं पिक
उभा झेलतो तपन
बीज उगंल सावलीचं
वैराण या माळी
देगा आसवाचं दान
पाणी आटलं डोऱ्याचं
धाड वळीवाची सर
येरे येरे मेघा शिवारात
अवंदा तरी येऊ दे
पिक दारी दाण्याचं
मिळू दे भाकर पोरास्नी
तोच मज दिवाळी सण
प्रा.सौ. तारका रुखमोडे
अर्जुनी जि. गोंदिया
======
0
6
3
9
6
0



