
0
4
8
2
8
4
घातपात
इथे प्रत्येक जीवामात्राला
क्षणभंगुरतेचा असे शाप
कुणी अल्प कुणी दिर्घायू
आधीच निश्चित असे माप.. //
दाही दिशांना घोंघावतोय
इथे मृत्यूचा फेरा अहोरात
ना जाणो कधी कोणाचा
कोण्या क्षणी होई निःपात.. //
कधी चाहूलही ना लागता
तो येतोय अगदीच निवांत
आणि हसरा खेळता जीव
एकाच क्षणात होतो शांत.. //
कधी रौद्ररूप महाभयंकर
परिणाम पाहताच थरकाप
त्याला नसे मुळी दयामाया
सुक्यासोबत ओलेही साफ.. //
चर्चेला उत कारणे हजार
असा कसा अघात अपघात
हसत असेल का मृत्यू मनात
जेव्हा म्हणेल कुणी घातपात.//
विष्णू संकपाळ
बजाजनगर छ. संभाजीनगर
0
4
8
2
8
4



