माझी पाककला पनीर मल्टीग्रेन्स क्वीन
मीनाक्षी काटकर ता.दारव्हा जि.यवतमाळ
माझी पाककला
पनीर मल्टीग्रेन्स क्वीन
साहित्य: मल्टीग्रेन पीठ चार कप, दोन कप किसलेले पनीर, (दोन टोमॅटो ,दोन कांदे,आठ-दहा लसूण पाकळ्या ,एक वाटी चिरलेला पालक, एक वाटी कोथिंबीर ,आठ-दहा हिरव्या मिरच्या,या सर्व साहित्याची पेस्ट करून घ्या) मीठ, हळद, लाल तिखट, ओवा एक चमचा, तीळ अर्धी वाटी इत्यादी फोडणीसाठी.
साहित्य: एक कप भाजलेल्या कांदाखोब-याचे वाटण, आले लसूण पेस्ट एक चमचा, दोन चमचे लाल तिखट, हळद, एक चमचा गरम मसाला,दोन मोठे चमचे तेल, मीठ, अर्धी वाटी कोथिंबीर
कृती: वरील पेस्टमध्ये तिखट,मीठ,हळद,ओवा ,तीळ घाला.त्यात बसेल एवढे पीठ घालून घट्ट मळा.गोलगोल शेंगोळे तयार करून घ्या.पातेल्यात तेल घाला.आले लसूण पेस्ट,कांदाखोब-याचे वाटण घालून परता.तिखट ,हळद,गरम मसाला घालून परता.दोन गडवे पाणी घाला.उकळी आली की त्यात शेंगोळे घाला.मंद आचेवर शिजू द्या.नंतर कोथिंबीर घाला. खाण्यासाठी तयार आपली पनीर मल्टीग्रेन क्वीन.
टीप:ही रेसीपी आपण सांबरमध्ये पण बनवू शकतो.
वाढप- ही रेसीपी दोन व्यक्तींना पुरेल.
मीनाक्षी काटकर
ता.दारव्हा जि.यवतमाळ



