“अभिनंदनाचा वर्षाव म्हणजे एक आनंदपर्वनीच”; डॉ बालाजी राजुरकर
मराठीचे शिलेदार समूहाप्रती आभारीय मनोगत

“अभिनंदनाचा वर्षाव म्हणजे एक आनंदपर्वनीच”; डॉ बालाजी राजुरकर
मराठीचे शिलेदार समूहाप्रती आभारीय मनोगत
मराठीचे शिलेदार समूहातील काव्यक्षेत्रात सर्वोत्कृष्ट रचनेचा सन्मान कुणाला मिळतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असते. विशेषतः काव्यरचना नियमितपणे लिहिणाऱ्यांना यांचे कौतुक असते. हा सन्मान ज्याला मिळतो त्याच्यावर होणारा अभिनंदनाचा वर्षाव म्हणजे एक आनंदपर्वनीच म्हणावं लागेल.
मी ही काव्यरचना ‘कंदिलशून्य’ लिहिताना सर्व जग काळोखमय झालेलं दिसलं. जिकडे तिकडे पाहताना आशेचा किरण कुठेच गवसत नव्हता आणि त्याच प्रेरणेतून लेखणी चालायला लागली. वाटलं आपली रचना आशेचा किरण जरी दाखविणारी नसली तरी, कमीत कमी वाचकांना विचार करायला नक्कीच लावेल.
बरेचदा विचार मनात घुमतो परीक्षकांना विषय कसे सुचतात. अनेक विषय खोलवर विचार करायला भाग पाडतात आणि वास्तविकतेची जाणीव आपल्याला करून देतात. समाजिक प्रश्न अनेक आहेत पण त्यावर वाच्यता करणारे फार कमी. आपण बोललं पाहिजे, व्यक्त झालं पाहिजे, तेव्हाच जाणीव होईल लोकांना आणी शोधतील त्यांना पडलेल्या प्रश्नांची उत्तरे.
राहुल दादा तुमचे आभार मानावे तेवढे कमीच आहे. सविता ताई आपला ‘मोरल सपोर्ट’ प्रेरणादाई आहेच. विष्णू दादा, सारिकाताई, स्वातीताई, सुरेखाताई संजय दादा, बी. एस. गायकवाड दादा आणि या समूहातील सर्व तसेंच सर्व परीक्षक यांच्या ऋणात राहणे मला पसंत आहे. पुन्हा एकदा सर्वांचे आभार धन्यवाद.
डॉ. बालाजी राजुरकर
ता.हिंगणघाट जि. वर्धा
सदस्य, मराठीचे शिलेदार समूह





