0
4
8
3
0
1
करितो आम्ही प्रणाम
स्वातंत्र्याची उगवली पहाट
सुटला जल्लोषाचा वारा
दुमदुमतो ढोल नगारा
फडकतो तिरंगा प्यारा .
स्वातंत्र्य मिरवितो आम्ही
रक्त सांडले देशभक्तांनी
नतमस्तक होऊ चरणी
ध्वजवंदन करूनी .
परतंत्राचे बंद तोडले
त्या बलिदानाला सलाम
मरून अमर जाहले
त्या वीरांना करितो आम्ही प्रणाम
भारतभूचे करू संरक्षण
तिरंगा आमुचा प्राण
एक संघ आम्ही भारतवासी
भारतभूची आण .
विमल धर्माधिकारी
वाई,जि.सातारा
==========
0
4
8
3
0
1



