साहित्य क्षेत्रातील बेफिकीरी म्हणजे आमची ‘कमतरता’; बळवंत डावखरे
बळवंत डावखरे, नांदेड
साहित्य क्षेत्रातील बेफिकीरी म्हणजे आमची ‘कमतरता’; बळवंत डावखरे
आपल्या बेफिकीर वृत्तीने स्थगित झालेला ‘काव्यक्षेत्रातील सर्वोत्कृष्ट रचनेचा उपक्रम व स्पर्धा बऱ्याच दिवसांनी सुरु झाली याचा मनस्वी आनंद झाला. ती स्पर्धा का?कशामुळे? व कुणामुळे? थांबवलेली होती याचा विचार शिलेदार समूह सदस्यांनी निश्चितच केला असावा.
आज ही स्पर्धा व उपक्रम सुरु झाला आणि सकाळीच तुमचा फोटो पाठवा हा राहुलभाऊंचा संदेश वाचून अनपेक्षित आनंद झाला.थोड्याच वेळात माझी ‘कमतरता’ ही त्रिवेणी सर्वोत्कृष्ट पोस्टरवर झळकली हे पाहून मनाला समाधान वाटले.
‘मराठीचे शिलेदार’ समूहातील सदस्यांना विनंती आहे की, आपण सर्वांनी लिहिते झाले पाहिजे. त्यामुळे विचारशक्ती, चिंतनक्षमता, आकलनशक्ती, शब्दभांडार, कल्पनाशक्ती यात निश्चितच वृद्धी होऊन मन ताजेतवाने राहते. राहुलभाऊ, सविताताई, वनिताताई, वैशालीताई, तारकाताई, वृंदाताई, सुधाताई, विष्णूदादा, संग्रामदादा, संजयदादा प्रशांतभाऊजी यासह सर्व शिलेदार ताई दादांच्या कायम ऋणात राहू इच्छितो.
बळवंत डावखरे, नांदेड
सदस्य मराठीचे शिलेदार समूह



