मराठीचे शिलेदार समूहाने माझे ‘बाल साहित्य ‘ समृद्ध केले; सुमन शेवाळे
समूहातील सर्व सदस्यांचे मनापासून आभार

मराठीचे शिलेदार समूहाने माझे ‘बाल साहित्य ‘ समृद्ध केले; सुमन शेवाळे
समूहातील सर्व सदस्यांचे मनापासून आभार
माझ्या बालकाव्यास सर्वोत्कृष्ट कवितेचा मान दिल्याबद्दल आदरणीय राहुल पाटील सर , सविता ताई त्यांची खूप आभारी आहे. त्याचबरोबर समूहातील सर्व कवी कवयित्री आणि विशेष म्हणजे आदरणीय …गायकवाड सर , शैलेश सर , पुरुषोत्तम सर, विमल ताई, सविताताई, सुलोचनाताई, दीपाताई, कुसुमताई, अनिताताई, सुरेखाताई, माधुरीताई यांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल खूप खूप आभार. आपण दिलेल्या शुभेच्छा मला लाखमोलाच्या आणि लेखणीला नवी ऊर्जा देणाऱ्या आहेत .
मराठीचे शिलेदार ‘आम्ही बालकवी’ या समूहात सहभागी झाल्यापासून माझे बाल साहित्य खूप वाढत आहे याचा खूप आनंद आहे . यासाठी मी विशेष धन्यवाद देईल ते आदरणीय शैलेश गायकवाड सरांचे. कारण त्यांनीच मला या समूहात सहभागी होण्यासाठी मार्गदर्शन केले .
रोज विषय मिळाला की त्यावर काय लिहायचे आणि उत्तमोत्तम कसे लिहिता येईल याचा विचार करण्यास सुरुवात होते. एखाद्या दिवशी विषय खूप अवघड वाटतो . आज लिहिता येईल की नाही … काही सुचेल की नाही, असे वाटते पण लिहायला बसले की आपोआप सुचायला लागते. मी पहिली ते दहावीचे क्लासेस घेते. माझ्या क्लास मधील सर्व मुलांना रोज माझ्या कविता ऐकायच्या असतात आणि त्यावर बनवलेला व्हिडिओ सुद्धा आवडीने पाहायचा असतो . त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद , उत्सुकता पाहून एक वेगळेच समाधान मिळते.हे सर्व काही या समूहामुळेच शक्य झाले आहे. पुन्हा एकदा सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद
सौ. सुमन विजय शेवाळे
जिल्हा नाशिक
सदस्या मराठीचे शिलेदार समूह



