गुरूवारीय ‘चित्र चारोळी काव्यस्पर्धेतील रचना
मुख्य संपादक:राहुल पाटील
*📗संकलन, गुरूवारीय ‘चित्र चारोळी काव्यस्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*❇मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘गुरूवारीय चित्र चारोळी’ स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना’*❇
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट बारा🎗🎗🎗*
*🌤️विषय : हीच ना पोटभरणी🌤️*
*🔹गुरूवार : ३० / ०१ /२०२५*🔹
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी साप्ताहिक साहित्यगंध १५६ साठी साहित्य पाठवून उपकृत करावे*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*हीच ना पोटभरणी*
कांदा भाकर तिखटाची चटनी
खाऊन आली तृप्तीची ढेकर
सांगा आता हीच ना पोट भरणी
फिके आहे ते गूळ आणि साखर
*सौ.तृप्ती वंजारी तुमसर भंडारा*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🥬🌶️🥬♾️♾️♾️♾️
*हीच ना पोटभरणी*
कांदा भाकर चटणी
हीच ना पोटभरणी
तोंडाला सुटते पाणी
गरीबा घरची राणी ॥
*श्रीमती नीला पाटणकर,शिकागो*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🥬🌶️🥬♾️♾️♾️♾️
*हीच ना पोटभरणी*
कांदा भाकरी अन् चटणी
कष्टकरींची हीच ना पोटभरणी
सण नैवेद्य पुरणपोळी गुळवणी
आनंदाची ही आमची पर्वणी
*सुनीता पाटील*
*जिल्हा अहिल्यानगर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🥬🌶️🥬♾️♾️♾️♾️
*हिच ना पोटभरणी*
रूचकर जेवण मेजवाणी
बघा हिच ना पोटभरणी
कांदा भाकर लाल चटणी
फळ सत्कर्म लागे करणी
*सविता धमगाये,नागपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🥬🌶️🥬♾️♾️♾️♾️
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपली छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ५.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*हीच ना पोटभरणी*
कष्टाच्या घामाचा सुगंध
जीवनात हीच ना पोटभरणी
शेतात राबराब राबून खातो
कांदा,भाकर आणि चटणी
*सौ.कुसुम पाटील कसबा बावडा कोल्हापूर*
*©️सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🥬🌶️🥬♾️♾️♾️♾️
*हीच ना पोटभरणी*
पंचपक्वानापेक्षाही भारी आहे
कांदा भाकर आणि तेलचटणी
हीच ना पोटभरणी असे म्हणतो
तो कुठं जाणतो भाकरीची कहाणी
*राजश्री मिसाळ ढाकणे बीड*
*शिक्षिका, कवयित्री, हायकूकारा*
*©सदस्या – मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🥬🌶️🥬♾️♾️♾️♾️
*हीच ना पोटभरणी*
देवा कष्टाचीच मिळू दे
कांदा, भाकर,चटणी….
ती रोज सुखात मिळू दे
हीच ना पोटभरणी….
*सौ स्वाती तोंडे पाटील*
*इंदापूर पुणे*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🥬🌶️🥬♾️♾️♾️♾️
*हीच ना पोटभरणी*
कांदा चटणी भाकरी
हीच ना पोटभरणी खरी
फिकी आहे हिच्यापुढे
श्रीखंड अन् पुरी
*बी. आर. पतंगे (beeke )*
*अहिल्यानगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🥬🌶️🥬♾️♾️♾️♾️
*हीच ना पोटभरणी*
प्रतिकूल स्थिती जरी आली
सुखाची हीच ना पोटभरणी,
कधीही नसते कमी कशाची
आईचीच खरंच आहे करणी.
*श्री.रविंद्र भिमराव पाटील.*
*ता.चोपडा, जि.जळगांव.*
*©मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🥬🌶️🥬♾️♾️♾️♾️
*हीच ना पोटभरणी*
कष्ट करतो रात्रंदिन आम्ही
खातो कांदा,चटणी,भाकर
आमची हीच ना पोटभरणी
मजुरांना कुठे तुप साखर?
*श्रीमती सुलोचना लडवे*
*अमरावती*
*©सदस्या,मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🥬🌶️🥬♾️♾️♾️♾️
*हीच ना पोटभरणी*
चटनी भाकर लोणचे आंबील
हीच ना पोटभरणी आपली
दोन पैशाची मजूरी करतोच
जावू देत नाही वेळ खाली
*केवलचंद शहारे*
*सौंदड गोंदिया*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️🥬🌶️🥬♾️♾️♾️♾️
*हिच ना पोटभरणी*
दोन वेळेला पोटासाठी
हवीय कांदा, भाकर चटणी
निरोगी, स्वस्थ, आरोग्यासाठी
खरी हिच ना पोटभरणी.
*सौ. इंदु मुडे, ब्रम्हपुरी/ चंद्रपूर*
*©सदस्या ,मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🥬🌶️🥬♾️♾️♾️♾️
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*💐सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार चित्र चारोळी समूह*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖



