Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजनपरीक्षण लेखपश्चिम महाराष्ट्रपुणेसाहित्यगंध

पर्यटनस्थळ ‘महाबळेश्वर’

स्वाती मराडे-आटोळे

0 4 8 2 9 0

पर्यटनस्थळ ‘महाबळेश्वर’

महाबळेश्वर हे एक थंड हवेचे ठिकाण आहे. येथील ‘महाबळेश्वर’ हे महादेवाचे देऊळ यादव राजा सिंघनदेव याने तेराव्या शतकात बांधले. या ठिकाणी चांगली घनदाट वनश्री आहे. महाबळेश्वर येथील महाबळेश्वर मंदिर, लागून असलेले जावळीचे खोरे आणि प्रतापगड या सर्व स्थळांना शिवरायांच्या नावाचा व कर्तृत्वाचा ऐतिहासिक संदर्भ आहे. महाबळेश्वरला पावसाचे प्रमाण खूप असून पावसाळ्यात हा परिसर जलमय असतो. येथील निसर्गसौंदर्य व या ठिकाणी असलेले पॉइंट्स खूप आकर्षक आहेत. विल्सन पॉइंट, आर्थर सीट पॉइंट, मंकी पॉइंट हे त्यांपैकी प्रसिद्ध डोंगरकडे असून या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी असते.

महाबळेश्वराच्या मंदिरातून कृष्णा, वेण्णा, कोयना, सावित्री, गायत्री, सरस्वती आणि भागारथी या सात नद्या उगम पावतात. येथे पंचगंगेचे देऊळ आहे. हे ठिकाण क्षेत्र महाबळेश्वर म्हणून प्रसिद्ध आहे. ‘सावित्री’ ही नदी पश्चिमवाहिनी आहे तर बाकीच्या चार नद्या पूर्ववाहिनी आहेत. यापैकी पहिल्या पाच नद्यांचा ओहोळ सतत बाराही महिने वहात असतो. सरस्वतीचा ओहोळ मात्र प्रत्येक ६० वर्षानी दर्शन देतो. भागीरथीचा ओहोळ प्रत्येक १२ वर्षानी दर्शन देतो. येथून बाहेर पडल्यानंतर कृष्णा नदी स्वतंत्र वाहते. येथे कृष्णाबाई हे स्वतंत्र मंदिर आहे. येथून पूर्ण कृष्णा दरी पाहता येते. या मंदिरात शिवलिंग आणि कृष्णाची मूर्ती आहे. ‘मंकी पॉईंट’ या ठिकाणी नैसर्गिकरित्या तीन दगड आहेत ते मंकी सारखे समोरासमोर बसलेले आहेत असे वाटते.आर्थर सीट पॉइंट हा समुद्र सपाटीपासून १,३४० मीटर उंचीवर असलेला हा महाबळेश्वरमधील एक पॉइंट आहे. अप्रतिम नैसर्गिक देखाव्यासाठी हे स्थान प्रसिद्ध आहे. खाली खूप खोल दरी आहे.

‘वेण्णा’ तलाव म्हणजे तर पर्यटकांचे मोठे आकर्षण होय. वाघाचे पाणी या नावाचा मोठा जलाशय येथे आहे. येथे वाघ पाणी पिण्यासाठी येतात असा समज आहे. केटस् पॉईंट (नाकेखिंड) महाबळेश्वरचे पूर्व बाजूस हा पॉइंट आहे. येथून तुम्ही बलकवडी आणि धोम धरणांचा देखावा पाहू शकता. जवळच निडल पॉइंट आहे. नैसर्गिक रित्या खडकाला सुईच्या नाकासारखे भोक आहे ते सहजतेने दिसते म्हणून त्याला ‘नीडल होल’ नाव दिलेले आहे. हा पॉइंट हत्तीच्या सोंडेसारखा दिसतो म्हणून त्याची डेक्कन ट्रप म्हणून ही प्रसिद्धी आहे. महाबळेश्वर मेढा मार्गाच्या पाठीमागील बाजूस महाबळेश्वर शहरापासून १.५ किमी अंतरावर ‘विल्सन पॉइंट’ हा सिंडोला टेकडीवरील सर्वात उंच पॉइंट आहे. येथून तुम्ही सूर्योदय आणि सूर्यास्तही पाहू शकता. महाबळेश्वर बाजारपेठ फार प्रसिद्ध आहे. येथे लोकरीचे कपडे, स्वेटर, चमड्याचे पट्टे, चमड्याची पाकीटे इ. वस्तू विविध प्रकारात मिळतात.

स्वाती मराडे-आटोळे
इंदापूर, पुणे
सहसंपादक, साप्ताहिक साहित्यगंध
===========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे