Breaking
आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजनगोंदियानागपूरमहाराष्ट्रविदर्भ

न्यु मून शाळेत ७८ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन व गुणगौरव

0 4 8 2 9 7

न्यु मून शाळेत ७८ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन व गुणगौरव

तारका रूखमोडे, जिल्हा प्रतिनिधी

अर्जुनी / मोरगाव :स्थानिक न्यु मून इंग्लिश मिडीयम स्कूल तथा सायन्स ज्युनिअर कॉलेज अर्जुनी/ मोर. येथे स्वातंत्र्यदिन अगदी उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी शाळा समितीचे उपाध्यक्ष गिरीश पालीवाल यांच्या अध्यक्षतेखाली शाळेचे सचिव ओमप्रकाशसिंह पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून शाळा समितीचे विश्वस्त संतोष बुकावन , प्राचार्य राकेश उंदिरवाडे,पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष भागवत मुनेश्वर , पा. शि. संघाच्या सहसचिव पुष्पा खोब्रागडे,तथा सर्व सदस्यगण, विशाखा समितीच्या पदाधिकारी राधिका भेंडारकर, प्रतिष्ठीत नागरिक आशिफ शेख, राजेश फुल्लेवार उपस्थित होते. स्कूलमधील
राष्ट्रीयछात्रसेनेच्या विद्यार्थ्यांकडून अतिथींना मानवंदना देण्यात आली. स्वातंत्र्यदिनाच्या या पार्श्वभूमीवर विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये नृत्य , भाषणे ,समूहगीते यांचे सादरीकरण करण्यात आले.

‘हर घर तिरंगा’ या अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धा ,निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, वर्गसजावट स्पर्धा तसेच गोंदिया क्रीडा विभागार्तंगत क्रीडास्पर्धा,विज्ञान स्पर्धा, अशा विविध क्षेत्रात प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. तसेच बुद्धिबळ स्पर्धेत तालुक्यातून प्रथम आलेला विद्यार्थी वेद चौरासिया याला पदक व प्रशस्तीपत्र देऊन पालकांसह सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला प्रतिष्ठीत नागरिकांची व पालकांची भरभरून उपस्थिती होती.

प्रमुख अतिथी म्हणून ओमप्रकाशसिंह पवार यांचे स्वातंत्र्य दिनावर अत्यंत उद्बोधक व प्रेरणादायी भाषण झाले. त्यामध्ये त्यांनी सांगितले की , अगणित स्वातंत्र्यसैनिकांनी दिलेल्या बलिदानामुळे व स्वातंत्र्यप्राप्तीच्या चळवळीमुळे आपला देश स्वतंत्र झाला. यशस्वीतेसाठी पर्यवेक्षिका तारका रुखमोडे, सुरज मोटघरे ,प्रवीण नागपूरे, निकिता बन्सोड, हिना लांजेवार ,प्रतीक्षा राऊत, प्रतीक्षा डोंगरवार ,सुषमा गायकवाड, मयुरी नाकाडे, छबू बागडे ,चंद्राताई शिवनकर ,पायल बोरकर, लिना चचाणे ,शीला बोरीकर, ज्ञानेश्वर परिहार यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन त्रिवेणी थेर व आभार चंद्रशेखर लांडगे यांनी मानले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे