0
4
8
2
8
6
हळव्या माझ्या मनाला
हळव्या मनाला माझ्या
आस तुझ्या सहवासाची
आर्त ही साद फक्त
या उरलेल्या श्वासाची
पैंजण पाऊलीचे तुझ्या
झंकारती माझ्या कानी
गीत तुझेच ओठी सखे
आतुरली माझी वाणी
डोळे तुझ्याच वाटेवर
नजर आहे बावरी
वाट तुझीच पाहणार
जीव जीवात जोवरी
टाकले उसासे कितिदा
सुर तेच आळवितो
ठोका चुकता हृदयाचा
जरा जरा सावरतो
येशील भेटावयास मला
ध्यास तुझाच लागला
वेळ नको लावू सजणी
हा श्वास माझा थांबला
पांडुरंग एकनाथ घोलप
ता.जुन्नर,जि.पुणे
========
0
4
8
2
8
6



