गुरूवारीय ‘चित्र चारोळी काव्यस्पर्धेतील रचना
मुख्य संपादक राहुल पाटील

*📗संकलन, गुरूवारीय ‘चित्र चारोळी काव्यस्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*❇मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘गुरूवारीय चित्र चारोळी’ स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना’*❇
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट दहा🎗🎗🎗*
*🌤️विषय : पंगतीत जेवतांना🌤️*
*🔹गुरूवार : ०२ / ०४ /२०२६*🔹
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी साप्ताहिक साहित्यगंध २१२ साठी साहित्य पाठवून उपकृत करावे*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*पंगतीत जेवतांना*
पंगतीत जेवतांना
प्रार्थना गुंजली
प्रत्येक घासाघासत
कृतज्ञता उमलली
*वर्षा मोटे पंडित*
*छत्रपती संभाजी नगर*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💥💐💥➿➿➿➿
*पंगतीत जेवताना*
पंगतीत जेवतांना पाहून
माझे ओढाळ मन हरखले
नकळत बालपण घेऊन
गावच्या वाड्यावर फिरकले
*समिक्षा हळबे*
*डोंबिवली/ पूर्व, जि. ठाणे*
*©सदस्य: मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💥💐💥➿➿➿➿
*पंगतीत जेवताना*
आई नेहमी म्हणायची
पंगतीत जेवताना जावे
तेथील अन्न हे पूर्णब्रम्ह
प्रसाद समजूनच खावे
*राजश्री मिसाळ ढाकणे बीड*
*शिक्षिका, कवयित्री, हायकूकारा*
*©सदस्या – मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💥💐💥➿➿➿➿
*पंगतीत जेवताना*
पंगतीत जेवताना टळते
रांग लावायची तगमग
पदार्थांची होत नाही सरमिसळ
खाणार शांत अन वाढप्यांची लगबग
*सौ. रजनी भागवत.*
*ऐरोली, ठाणे*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💥💐💥➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य प्रशासक राहुल पाटील 7385363088 वर यांना ४.०० पूर्वी पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*पंगतीत जेवतांना*
अगदी खूप भारीच वाटायचे
पूर्वी एकत्र पंगतीत जेवतांना,
आईस आनंद होतसे खरंतर
गोड पदार्थ ताटात ठेवतांना.
*रविंद्र भिमराव पाटील*
*शारदानगर,चोपडा,जि.जळगाव*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💥💐💥➿➿➿➿
*पंगतीत जेवतांना*
अजूनही गावाकडच्या लग्नामध्ये
वेगळेच सौख्य पंगतीत जेवतांना
लुप्त होत चालली आहे परंपरा
विकासाच्या वाटेवर चालताना
*सौ. सुरेखा रावसाहेब चित्ते कांबळे*
*श्रीवर्धन जि. रायगड*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿💥💐💥➿➿➿➿
*पंगतीत जेवतांना….!!*
चेहऱ्यावरती आनंद सोबती जीवनसाथी
आनंदाने वाढत आहेत बघा वाढपी
हात जोडून करावी अन्नपूर्णेची वंदना
समाधानाचा घास पंगतीत जेवतांना..!!
*शर्मिला देशमुख -घुमरे, बीड*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💥💐💥➿➿➿➿
*पंगतीत जेवतांना*
पंगतीत जेवतांना भेद नसावा
घासा-घासात प्रेम गोड आसावा
जेवुन जेवावे पंगतीत…!
मरण यावे हिमतीत…!
*नरेंद्र साबळे*
*ता गंगाखेड जि परभणी*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💥💐💥➿➿➿➿
*पंगतीत जेवताना…!!*
पंगतीत जेवताना मजा काही वेगळीच असायची
एकमेकांना आग्रह करत माणसातली माणुसकी दिसायची
पण आता पंगती पांगल्या अन जेवायला आली टेबल खुर्ची
आग्रह करणं सोडा प्रत्येकाला घाई स्वतःचं पोट भरायची
*सौ. अनिता व्यवहारे*
*ता. श्रीरामपूर जि अहिल्यानगर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💥💐💥➿➿➿➿
*पंगतीत जेवतांना*
पंगतीत जेवतांना
असायची वेगळीच गंमत
आधुनिक बुफे संस्कृतीत
वाटेना जेवणात ती रंगत.
*सौ, इंदु मुडे, ब्रम्हपुरी, चंद्रपूर*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समुह*
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*💐सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार चित्र चारोळी समूह*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖



