कर्नाटकात चार मराठी पुस्तकांचे प्रकाशन समारंभाचे आयोजन
ज्येष्ठ साहित्यिक भारत सातपुते यांच्या हस्ते होणार प्रकाशन
कर्नाटकात चार मराठी पुस्तकांचे प्रकाशन समारंभाचे आयोजन
ज्येष्ठ साहित्यिक भारत सातपुते यांच्या हस्ते होणार प्रकाशन
कर्नाटक बिनथास्त न्यूज नेटवर्क
हुमनाबाद: कर्नाटकातील छत्रपती शिवराय मराठी साहित्य संस्कृती मंडळाच्या वतीने चार पुस्तकांचे प्रकाशन लातूरचे ज्येष्ठ साहित्यिक भारत सातपुते यांच्या हस्ते संपन्न होणार असून या प्रसंगी कविसंमेलनही आयोजित करण्यात आले असून या कार्यक्रमाचे उद्घाटक बिदर जिल्हा पंचायतचे माजी उपाध्यक्ष डॉ. प्रकाश पाटील तर अध्यक्षस्थानी प्राचार्य व्यंकटराव जाधव राहणार आहेत. याप्रसंगी विशेष उपस्थिती उदगीर येथील वाचक संवादचे संयोजक व लेखक अनंत कदम यांची राहणार आहे.
गंभीरानंद सोमवंशी यांचे उंबरठा ,भीमराव गणेश यांचे ज्ञानेश्वर माऊली प्रसाद मालिका, अ.के. आकरे यांचे चोरी, तानाजी सावरे यांचे डोंगरघाट या चार पुस्तकांचा याप्रसंगी प्रकाशन कार्यक्रम होणार आहे.
हा कार्यक्रम बिदर जिल्ह्यातील हुमनाबाद जवळ घाटबोरुळ येथे शनिवार दि.8 मार्च 25 रोजी सकाळी साडेदहा वाजता मातोश्री मालनबाई डिग्री कॉलेजमध्ये होणार आहे.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सतीशकुमार मुळे, डी. जी. जगताप डॉ. जयभारत भालके ,अभिमन्यू निरगुडे ,सूर्यकांत ससाने, तुकाराम मोरे येणार आहेत.
दुसऱ्या सत्रात संमेलनाध्यक्ष भारत सातपुते यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन होणार असून यामध्ये दत्तात्रय पवार, आनंद जाधव, प्रदीप नाईक, रणजीत शिंदे, अनिता गाडे, रविदास कांबळे, केशव बिरादार, सतीश सावळे, मिलिंद शिंदे, मल्हारी कांबळे, विजयकुमार साकुळे,अशोक पाटील आदी कवी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमांचे सूत्रसंचालन अ.के. आकरे व अंजली मुळे करणार आहेत. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन स्वागताध्यक्ष डॉ . सुब्बाराव पाटील , भानुदासराव पाटील यांनी केले आहे.





