Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरनागपूरपरीक्षण लेखमहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध

शांततेचा आवाज

रंजना पोलके ता. जि.नागपूर

0 5 7 4 4 8

शांततेचा आवाज

नवल वाटेल, पण खरंच शांततेलाही आपला असा एक आवाज असतो..!! शांततेच्या आवाजात खूप मोठी ताकद असते. लहान मुलं सारखे खेळत असतात, त्यांचा काही ना काही आवाज सारखा सुरू असतो तो अचानकपणे शांत झाला. त्याचा काहीच आवाज येईनासा झाला, तर त्याची आई लगेच समजून जाते काहीतरी गडबड आहे. त्याचप्रमाणे, प्रत्येक शांतते मागे खरीच शांतता आहे का किंवा काहीतरी वेगळे कारण आहे हे निरखून बघितले असता कळतं की ही खरीच शांतता आहे की नाही. असे म्हणतात की, “शांततेचा आवाज शांत राहूनच ऐकावा लागतो , तेव्हा तो कळतो” आणि जेव्हा शांतता बोलते . तेव्हा शांतता जे काही बोलते ते शब्दांच्या पलीकडले असते धीर गंभीर अर्थ तिथे असतात. जे अनेक शब्दही बोलू शकत नाही ते शांतता बोलत असते . सर्व शब्द तिथे थिटे असतात. मनाला ते भिडत असतात. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या शांततेचे वातावरण असते. त्या प्रत्येक शांततेला एक वेगळा आवाज व वेगळा अर्थ असतो.

धार्मिक ठिकाणी असलेली शांतता, आपल्या मनाची शुद्धी करत असते. अंतरात्म्याचा आवाज ऐकवत असते. ईश्वरीय शक्तिशी जोडून दिल्या जात असते. त्या ठिकाणी आपण आपोआप नतमस्तक होतो, लीन होतो. एखाद्या ठिकाणी गुढ शांतता पसरलेली असते. तेथे काही तरी गुढ रहस्ये दडलेली आहेत असे वाटते. एखादी शांतता भयाण असते. तिथे काही तरी नक्कीच अघटीत घडून गेले असावे असे वाटते आणि अनामिक भितीने मनाचा थरकाप होत असतो.
काही काही शांतता तणावदायक असतात. तिथे असं वाटत राहतं की, आता शांतता आहे; पण यानंतर नक्कीच मोठा स्फोट होईल. त्याला वादळापूर्वीची शांतता असे म्हणतात.

काही काही लोकांना आपल्या मनातलं कळू द्यायचच नसतं किंवा काहीतरी आपल्या पासून लपवून ठेवायचं असतं काही काही ठिकाणी खोटेपणाच असतो. अशा वेळेस आपल्याला त्यांच्या शांतपणाची चिड येते. काही काही लोकांना असेच करायचे असते स्वतः शांत राहून दुसऱ्याकडून काढून घ्यायचे असते, करवून घ्यायचे असते अशा वेळेस पण या शांततेला पाहून राग येतो. प्रत्येक शांत चेहऱ्यामागे असणाऱ्या शांततेचं कारण काही वेगळं असतं, त्यांच्या शांत राहण्यामागे न बोलण्यामागे असेच काही कारणं असतात, ते बिचारे विचारच करत बसले असतात की, समोरचा माणूस त्याच्या बोलण्याचा वेगळा अर्थ काढेल का? तो गुस्सा होईल का , आपल्या बोलण्यामुळे तो दुरावेल का म्हणून शांत बसतो, पण ते ही कधी कधी त्रासदायक होत असतं.

काही काही वेळेला आपल्या मनात नेमके काय चालले आहे आपले कुठे चुकते आहे या साठी शांततेचा आवाज ऐकण्याची गरज असते. काही काही लोकांच्या मनात दुःख लपलेले असते, मनात काही जखमा असतात ,अढी असते, की अशा वेळेस, बोलायचच नाही , कितीही काही झालं तरी ताणूनच धरायचं असा त्यांचा निग्रह असतो. असे शांत लोकं फार क्लेशदायक असतात. काही वरवर शांत दिसणाऱ्या चेहऱ्याच्या लोकांच्या मनामध्ये इतकी खळबळ असते , संघर्ष असतो, राग असृतो. हट्ट आणि दुराग्रह असतो असे लोकं तर फार खतरनाक असतात ते काही पण नुकसान करु शकतात. अशा लोकांमुळे दुरावा निर्माण होत असतो. दु़खद प्रसंगाच्या ठिकाणावरील शांतता मनाला चिरुन जाणारी असते. मनावर दगड ठेवून शांतपणे वेदना सहन करायला लावणारी असते. त्या शांततेचा आवाज अधिकच जिवघेणा वाटत असतो.

काही संवेदनशील मनाचे लोकं , आपले दुःख, आपल्या व्यथा, आपल्या जखमा, आपल्या सर्व भावना शांतपणे गिळून चेहऱ्यावर सुंदर हास्य फुलवत असतात.ते बहुतेक कलाकार असतात. कवी, लेखक आपल्या संवेदना सुंदर शब्द गुंफून आपल्या लेखणीतून उतरवतात . त्यांच्या भावना मनाला स्पर्शून जातात, वेगवेगळे आशय प्रतिबिंबित करतात. मनाच्या अंतरंगापर्यंत थेट विहार करत जातात. अंतरंगाचा आवाज ऐकवण्याचा आनंद देऊन जातात. अशा अनेक कलांचा आनंद शांततेच्या आवाजातून माणसाच्या मनाला रोमांचित करत असतो. असा हा शांततेचा आवाज आपल्याला बरंच काही शिकवून जातो…!!

रंजना पोलके
ता. जि.नागपूर
=======

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 7 4 4 8

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे