
0
5
7
4
4
8
इंद्रायणी पान्हा
भिजली-मिजली इंद्रायणी
सिद्धेश्वर कळस नागावणी डुलत
इंद्रायणीचा प्रेम पान्हा दाटे
आधीच ओली बाई;पुन्हा भक्तीत चिंब होई
ज्ञाना-तुकाच्या दारात इंद्रायणी ओवी गाई
ओवी गात गात चाल तिची पुढ पुढ
लोहदंड तिर्थावर चंद्रभागा गळा भेट
इंद्रायणी भक्तीरस सांगे ज्ञाना-तुकाचे मोठेपण
आयकुन मुक्त स्वर;विठ्ठल म्हणे रुक्मिणीस
चल जाऊ अलंकापुरास..!
आज निघायची घाई मुंगी दाटली बाई
कशी आवरू प्रेमाला अलंकापूर लोंडा गेला..!
नरेंद्र गंगाराम साबळे
ता. गंगाखेड, जि. परभणी
=========
0
5
7
4
4
8



