‘विधीतरंग’ २०२५ वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
‘विधीतरंग’ २०२५ वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
ॲड. दत्ता पाटील कॉलेज ऑफ लॉ येथे उत्साहात आयोजन
वक्तृत्वशैली विकसित करण्यासाठी ‘विधीतरंग’ सारखे मंच अत्यंत आवश्यक: ॲड गौतम पाटील
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
अलिबाग (दि १२ जाने) : ”केवळ कायद्याचे ज्ञान मिळवणे पुरेसे नसून, समाजात वावरताना लागणारा आत्मविश्वास आणि प्रभावी वक्तृत्वशैली विकसित करण्यासाठी ‘विधीतरंग’ सारखे मंच भावी वकिलांसाठी अत्यंत आवश्यक आहेत.” ॲड. दत्ता पाटील कॉलेज ऑफ लॉ च्या वतीने आयोजित वार्षिक स्नेहसंमेलन ‘विधीतरंग’ २०२५च्या उद्घाटन प्रसंगी ॲड गौतम पाटील यांचे प्रतिपादन.
दिनांक १० जानेवारी २०२५ रोजी या सोहळ्याचा शुभारंभ दिमाखात करण्यात आला.या कार्यक्रमाचे औचित्य साधून अलिबाग नगरपालिकेच्या नवनियुक्त नगरसेवकांचा जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अॅड. गौतम पाटील,उपाध्यक्षा डॉ. साक्षी गौतम पाटील आणि लॅा कॅालेजच्या प्राचार्य अॅड. नीलम किशोर हजारे यांच्याहस्ते महाविद्यालयाच्या वतीने शाल, श्रीफळ, आणि सन्मानचिन्ह देवून विशेष सत्कार करण्यात आला.
‘विधीतरंग’ २०२५ स्नेहसंमेलनानिमित्त महाविद्यालयात कलात्मक स्पर्धांसोबतच लॅटिन मॅक्झिम, इनडोअर गेम्स, लिगल क्विज मर्डर मिस्ट्री आणि ट्रेझर हंट अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. ‘ट्रेडिशनल डे’ निमित्त विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेशभूषा करून सोहळ्याची रंगत वाढवली.सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी संगीत, नृत्य, नाट्य, स्टॅण्ड अप कॉमेडी इ .सादर करून आपल्या कलागुणांचे दर्शन घडविले.विविध स्पर्धांमधील विजेत्या विद्यार्थ्यांना जनता शिक्षण मंडळाच्या उपाध्यक्षा डॉ. साक्षी गौतम पाटील यांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि मेडल देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन निलम म्हात्रे यांनी केले. या सोहळ्याला महाविद्यालयाच्या प्रा. डॉ.संदिप घाडगे, सांस्कृतिक समिती प्रमुख प्रा.पियुषा पाटील प्रा.चिन्मय राणे , प्रा.कौशिक बोडस, प्रा.सूरज पूरी, प्रा.साकेत जोशी यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



