0
4
8
2
9
3
कुंकू
कुंकवाची ताकत,तुला माहीत नाही।
म्हणून पाकड्या तु,आम्हास भीत नाही।।
एका क्षणात तुला,नष्ट करु शकतो।
सत्याचे बोल आहे,काही भाकित नाही।।
राग ईर्षाने असा,का जळतोस आम्हा।
आगित तेल तुझ्या,आम्ही टाकित नाही।।
बुध्द भुमीस माझ्या, युध्द नकोच आहे।
आतंकी विध्वंस हिंसेला मानीत नाही।
भीती कुणाची नाही,औलाद शिवबाची।
रक्षा करते कुंकू,बुरका घालीत नाही।।
चिंता अवणीची रे,लागली जीवा आता।
जन्म दिल्या आईला,तुच पाळीत नाही।।
हा टिळा कुंकवाचा,आहे समर्थ आता।
जिंकून चित होवू,ना पराजित नाही।।
गोवर्धन तेलंग
पांढरकवडा
=========
0
4
8
2
9
3



