Breaking
अमरावतीई-पेपरविदर्भसाहित्यगंध

संतमहिमा

श्रीमती सुलोचना लडवे

0 4 8 2 8 4

संतमहिमा

संतमहिमा अगाध
वर्णावा किती शब्दात
देती जीवनास दिशा
ज्ञानदिप ते जीवनात

मानी निंदा स्तुती सम
सदा मनी शांत भाव
स्पर्शे ना विकार तव
संत सद्गुणांचे ठाव

संत परोपकारी रूप
देती ज्ञानाचा प्रकाश
होई अज्ञान तम दूर
तोडी संसाराचा पाश

माया,मोह,विकारांची
करी जाळूनिया होळी
ज्योत सद्गुणांची जळे
ज्योतीर्मय सदा काळी

संत लिखाण अगाध
वाचता कळे जीवन
उपदेश करी जना
उजळे विचार,मन

श्रीमती सुलोचना लडवे
अमरावती
सदस्या,मराठीचे शिलेदार समूह

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे