0
4
8
2
9
7
शाळा आमची पंढरी
गोड चिमुकल्यांची दिंडी
निघाली आषाढीची वारी
विठ्ठल रुक्मिणी रूप छान
बोबडे बोल लय लय भारी…
फुलं रांगोळी मनमोहक
टाळ मृदंग अभंग गजर
भक्तीरसात चिंब भिजूनी
भगवी पताका खांद्यावर…
चंदन बुका टिळा भाळावर
गळ्यात तुळशीच्या माळा
लहान थोर रस्त्यावर सारे
पाहती कौतुकाने सोहळा…
ज्ञानोबा तुकाराम नामघोष
दुमदूमली अवघी गेवराई
विठ्ठलभक्ती संस्कार देती
वंदनीय सारे गुरुजी बाई…
अभंग पावलांचा ताल ठेका
विठ्ठल रुक्मिणी नि वारकरी
सजली आनंदाने दिंडी सारी
झाली शाळा आमची पंढरी…
राजश्री मिसाळ ढाकणे बीड
0
4
8
2
9
7



