0
4
8
3
0
0
जवान
भारतभूचे वीर जवान
घेऊनी हातावर प्राण
रात्रंदिन पहारा देतो
सुखी झोप आम्ही घेतो
कुणी नजर वाकडी करता
देशावरती चालून येता
देता उत्तर सडेतोड
तुमच्या पराक्रमाला नाही तोड
माता बहीण पत्नी वीर
देती तुम्हास सदैव धीर
जीवाची पर्वा केली नाही
सीमेवर ताठ उभे राही
ऊन वारा पाऊस पाणी
तयाची तमा तुम्हास नाही
देश रक्षिण्या वीर जवान
तुम्हीच आमचे वीर महान
सुनंदा किरसान
अर्जुनी मोर गोंदिया
==========
0
4
8
3
0
0



