32 व्या अखिल भारतीय राष्ट्रीय पावर लिफ्टिंग आणि सिंगल इव्हेंट बेंचप्रेस स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
नागपूर शहर प्रतिनिधी
32 व्या अखिल भारतीय राष्ट्रीय पावर लिफ्टिंग आणि सिंगल इव्हेंट बेंचप्रेस स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
नागपूर शहर प्रतिनिधी
नागपूर: (दि १८) ३२ वी अखिल भारतीय राष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग आणि सिंगल इव्हेंट बेंच प्रेस पुरुष-महिला अजिंक्यपद स्पर्धा (RAW)-२०२५ -२०२६ दि.१५ फेब्रुवारी रोजी श्री महावीर (हनुमान) मंदिर संस्कृतीक परिसर, आझाद चौक सदर, नागपूर येथे संपन्न झाली.
महाराष्ट्र राज्यातील प्लविंदर सिंग सैनी यांना ६४० किलो आणि ४२६ गुणांसह २०२५ -२६ चा भारताचा स्ट्रॉग मॅन म्हणून घोषित करण्यात आले, तर महाराष्ट्राच्या रश्मी ए जिझीलवार यांना महिला गटात ३९२.५ किलो आणि २८२.५ गुणांसह तिसऱ्यांदा २०२५-२६ चा भारताचा स्ट्रॉग वुमन खेळाडू म्हणून सन्मानित केले.
१४ फेब्रुवारी रोजी पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता ज्यामध्ये नवनिर्वाचित नगरसेवक प्रभाग क्रमांक १० येथील प्रमोद सिंग ठाकूर आणि श्रीमती सरस्वती सलामे उपस्थित होते आणि त्यांनी सब-ज्युनियर आणि ज्युनियर विजेत्यांना बक्षिसे वाटली.
१५ तारखेला नवनिर्वाचित नगरसेवक आणि मनपामधील सत्ताधारी पक्षाचे उपनेते विनोद कान्हेरे आणि नगरसेविका श्रीमती माधुरी ललित फुलसुंगे आणि अभिजीत झा यांच्या उपस्थितीत समारोप समारंभ पार पडला. त्यांनी सिनीअर आणि मास्टर्सना पदके वाटली.
अखिल भारतीय टायटल विजेते आहेत,
१. स्वप्निल जमगडे (महाराष्ट्र)- स्ट्रॉंग टीन ऑफ इंडिया २०२६
२. आर्या मोरे (मुंबई)- स्ट्रॉंग टीन गर्ल ऑफ इंडिया २०२६
३. आदित्य अदे (महाराष्ट्र)- स्ट्रॉंग बॉय ऑफ इंडिया २०२६
४. सुश्री आर्या डबीर (मुंबई)- स्ट्रॉंग गर्ल ऑफ इंडिया २०२६
५. श्री.ए. चंद्रप्पा (कर्नाटक)- भारताचा स्ट्रॉग मास्टर 2026
६. कु.अनिता देवईकर (महाराष्ट्र)- भारतातील स्ट्राँग मास्टर वुमन 2026 आहेत.
श्री. साळवी, करकरे, वनकर, प्रधान, निमखेडकर, संतोष नरसेकर, विजय बहादूर, आरिफ शेख, निलेश हिंगे आणि सुभाष कामडी यांनी राष्ट्रीय पंचाची भूमिका यशस्वीपणे पार पाडली.



