Breaking
अलिबागआरोग्य व शिक्षणई-पेपरकोकणक्रिडा व मनोरंजनरायगड

पेझारीचे अमोल पाटील यांना ‘महाराष्ट्र गुणगौरव पुरस्कार २०२६’

तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

0 6 2 0 2 3

पेझारीचे अमोल पाटील यांना ‘महाराष्ट्र गुणगौरव पुरस्कार २०२६’

तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

बिनधास्त न्यूज नेटवर्क

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील भैरवनाथ पेझारी गावचे सुपुत्र तथा प्रसिद्ध भजनकार, गायक श्री. अमोल आत्माराम पाटील (बुवा) यांच्या संगीत, भजन क्षेत्रातील तब्बल ३५ वर्षांच्या उल्लेखनीय योगदानासह सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना ‘महाराष्ट्र गुणगौरव पुरस्कार २०२६’ प्रदान करण्यात आला.

बी द चेंज फाउंडेशन, शिर्डी यांच्या वतीने रविवार, दि. २७ सप्टेंबर २०२६ रोजी शिर्डी येथील साई पालखी निवारा, साईबाबा मंदिर परिसर येथे राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात अमोल पाटील यांचा सन्मान करण्यात आला.

या पुरस्कार सोहळ्यास प्रभात डेअरी लिमिटेड व किसान कनेक्ट शेफ फूड प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक-संचालक मा. श्री. किशोर रामचंद्र निर्मळ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.

अमोल पाटील यांनी गेल्या ३५ वर्षांपासून भजन क्षेत्रात सातत्याने योगदान दिले आहे. भजनासोबतच ऑर्केस्ट्रा, महफिल आणि संगीत क्षेत्रातही त्यांनी आपल्या कलेची वेगळी ओळख निर्माण केली आहे. आपल्या गायनकलेच्या माध्यमातून त्यांनी विविध ठिकाणी कार्यक्रम सादर करत रसिकांचे मनोरंजन केले असून, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातही सक्रिय सहभाग नोंदविला आहे.

कलेसोबतच समाजासाठी विविध उपक्रमांमध्ये योगदान देत सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या अमोल पाटील यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना हा राज्यस्तरीय सन्मान देण्यात आला.

बी द चेंज फाउंडेशनच्या वतीने आयोजित या राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात राष्ट्रीय उद्योजक, महाराष्ट्र गुणगौरव आणि आदर्श शिक्षक पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यात आला. यावेळी अश्वमेघ ग्रुप ऑफ कंपनीजचे चेअरमन डॉ. ज्ञानेश्वर वाकचौरे, उद्योजक व चार्टर्ड अकाउंटंट बाळकृष्ण एखडे, महाराष्ट्र शासनाच्या कोपरगाव कृषी विभागाच्या मंडळ कृषी अधिकारी तेजस्वी यमाजी मोटे, सद्गुरू ग्रुपचे चेअरमन सर्जेराव मुंढे, विश्वरूप इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक बाबासाहेब कापे, पुणे येथील उद्योजक विशाल थोरात, अभिनेत्री व मॉडेल निवेदिता पगार तसेच नॅशनल सैनिक संघ, नाशिक, महाराष्ट्र राज्यचे कार्याध्यक्ष अरुण भंडारे आदी मान्यवर उपस्थित होते.

अमोल पाटील यांना मिळालेल्या या प्रतिष्ठेच्या सन्मानामुळे पेझारीसह अलिबाग तालुका आणि रायगड जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या या यशामुळे पेझारी गावाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 2 0 2 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे